Tuesday, 15 May 2018

कविता ( बंदिस्त जीवन )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

शिर्षक - बंदिस्त जीवन

पाहते निरखून एका डोळ्याने,
बंदिस्त हे असे जीवन माझे .
केविलवाणा भाव असे त्यात ,
पण गाते गीत हे तुझे .

ढगांमध्ये आकाशांतील ,
व्यापलाय माझाच चेहरा .
पण या चेहऱ्यावरचे भाव ,
घुसमटवतोय हा पिंजरा .

सारुन मुखवटा सोशिकतेचा ,
बंधमुक्त मला व्हायचयं .
नको फक्त शोभेची बाहुली ,
स्वावलंबी मला व्हायचयं .

मुक्त जरी केशसंभार हा ,
वाऱ्याविना निस्तब्ध आहे .
स्वातंत्र्याविना अस्तित्व माझे ,
जीवंतपनी मरणप्राय आहे.

गुलामगिरीचा तोडून पिंजरा ,
मुक्त जगी या विहरायचयं.
बंदिस्त जीवन साखळदंडातले ,
फेकून दूर मला जगायचयं.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment