Sunday, 13 May 2018

कविता ( जीवन एक संघर्ष )

क्रांतीची फुले ३ री फेरी स्पर्धेसाठी

विषय - जीवन एक संघर्ष

जीवन एक संघर्ष आहे ,
रोज नवे आव्हान आहे .
होण्या यशस्वी येथे ,
मार्ग काढण्या बेभान आहे .

अपयशाच्या वाटेने रोज ,
जावेच लागते यशाकडे .
दूर दिसला डोंगर जरी ,
पावले ऊचलावीत शिखराकडे .

दुःखाच्या संघर्ष यात्रेतून ,
अपेक्षा सुखाच्या पालखीची .
प्रयत्नांच्या पराकाष्ठेने ,
सहजसाध्य दिशा यशाची .

आली जरी संकटे अनेक ,
येतात बनवण्या सहनशील .
धीराने सामोरे जाऊन ,
पार होईल तोच धैर्यशील .

संघर्षमय जीवन देते ऊभारी ,
सकारात्मकतेने जगायला .
आदर्श वाटावा दुसऱ्यांना ,
हवे असे शिकवायला .

कोड क्र. 2043

No comments:

Post a Comment