रयत सनेतर्फे राजे संभाजी महाराज जयंतीनिमित्त काव्यलेखन स्पर्धेसाठी
विषय - ऐतिहासिक
शिर्षक - शूर संभाजी राजा
वीरपूत्र राजे संभाजी ,
ऊत्तराधीकारी क्षत्रपतींचे .
जन गाती शौर्याची गाथा ,
प्रबल शत्रू ते मुघलांचे .
जिंकल्या लढाया सर्व ,
कधी न पराभूत होता .
पाहून शूराचा पराक्रम ,
हवालदिल शत्रू झाला होता.
लिहले कोवळ्या वयात ,
संस्कृत ग्रंथ अनेक .
घोट अपमानाचे गिळले ,
पदोपदी संयमाने अनेक .
लढले शूर पराक्रमी ,
हरवून शत्रू पक्षाला .
पण गद्दारी आड आली ,
बळी पडले फितूरीला .
साहिला अनन्वित अत्याचार,
सोशिला शारीरिक छळ .
न बधले शत्रूला जराही ,
आणिले कुठुन हे बळ ?
वंदन मनोभावे करीती ,
लहान थोर ही जनता .
लढवय्या खरा या जगी ,
स्विकार या कुर्निसाता .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
No comments:
Post a Comment