काव्यस्पर्धेसाठी
फेरी क्र. १०
कोड नंबर -VBSS -KP 13
विषय -- विश्वशांती
गरज आज देशाला ,
खरंच शांततेची आहे.
जिकडे पहावे तिकडे ,
हाहाकार पसरला आहे .
दहशतवाद तर मूळ धरतोय ,
अराजकतेने पसरलेत पाय .
माणूसकीची बांधलीय तिरडी ,
धाय मोकलून रडते भारतमाय .
आयाबहीणींना नाही सुरक्षा ,
लिंगपीसाटांनी धरलाय फेर .
निरागस कळ्या कुसकरताना ,
निर्लज्ज झालेत व्यक्ती थोर .
विश्वशांती चा नारा देताना ,
थरथरतेय आमची वाणी .
नकोत नुसता भावा गाऊ ,
तू बंधुभावाची गोड गाणी .
समजून ऊमजून जगुया ,
मान सर्वांचा जगी ठेऊया .
मनाची शांती मिळवण्यासाठी ,
अशांतीला आता गाडूया .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment