Thursday, 10 May 2018

कविता ( शुक्रतारा )

शुक्रतारा

नभीचा तो शुक्रतारा ,
निखळून दूर गेला .
मंद वाऱ्याच्या झुळकीने ,
थिजवून आज गेला .

शब्दतेजाने तळपत राहिला ,
अवनीवरचा स्वरभास्कर .
प्रकाशित तो शब्दसुमनांनी ,
साहित्यात जाहला अमर .

झोपाळ्यावाचून झुलले ,
ते फुलायचे दिवस .
राजाराणीला भातुकलीच्या ,
आठवे कहाणीतले दिवस .

बोलायचे होते काही ,
पण बोललाच नाही .
धुंद रात्री पावसात ,
कधी भिजलोच नाही .

घडवून ईतिहास तुम्ही ,
या जन्मावर प्रेमच केले .
सप्तसुरांच्या मैफीलीतून ,
अलवार दूर तुम्ही गेले.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

No comments:

Post a Comment