स्पर्धेसाठी काव्यांजली
मनाचे दार
सहजच उलगडावे
सुंदर मनाचे दार
सर्व आरपार
दिसावे
देऊन दिलासा
व्यथित त्या मनाला
शब्द सांत्वनाला
प्रकटावे
रंजल्या गांजल्या
पिडीत या जनतेसाठी
न्याय देण्यासाठी
झगडावे
मनाचे दार
रहावे सतत उघडे
न्यायाची कवाडे
उघडावी
असावे आनंदी
जगी या सतत
सुख मनात
नेहमी
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment