स्फर्धेसाठी
नाते
नाते
गुरु शिष्यांचे
अखंडीत बहरत जाणारे
सतत दोघांच्या स्मरणात राहणारे
नाते
आईचे बाळाशी
अतूट प्रेमळ नात्याचे
स्नेह प्रेम अन् रक्ताचे
नाते
नवऱ्याचे बायकोशी
एकमेकांना समजून घेण्याचे
विश्वासाने आयुष्यभर एकत्र राहण्याचे
नाते
बहीणीसमान मैत्रीणीचे
मनातल्या भावना मांडण्याचे
एकमेकांला सावरुन धीर देण्याचे
नाते
मानवाचे समाजाशी
देशहिताचा विचार करणारे
हक्काबरोबर कर्तव्याची जाण असणारे
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment