उनाडवारा साहित्य समुह राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्यस्पर्धेसाठी
13/ 5 / 2018
विषय - हात तुझा माझ्या हाती
कायमची गोड नवी ,
राहू देत हीच नाती .
दुःख आणि आनंदात ,
हात तुझा माझ्या हाती .
आली जरी संकटे ती ,
तुझ्या जरी जीवनात .
तरी पाठी आहे उभी ,
तुझ्या याच प्रांगणात .
जीवनात लढण्याचे ,
बळ सदा असे यावे .
वादळाने संघर्षाच्या ,
मग रे पळून जावे .
प्रयत्नांची सदोदित ,
कर खूप पराकाष्ठा .
पोहचण्या त्या शिखरी ,
कर्मावर ठेव श्रद्धा .
यश आहे तूझ्यासवे ,
भान ठेवून ओळख .
योग्य वेळ धरायला ,
संधी कुठली पारख .
प्रयत्नांती परमेश्वर ,
ठेव लक्षात सत्वर .
कर्म करण्या तू रहा ,
असा सदैव तत्पर .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment