चित्रकाव्य स्पर्धेसाठी
कन्यादान
मानलं जरी कन्येला
धन परक्याच तरी
बापाला कन्यादान
हे करावचं लागत
लाडात वाढवली लाडकी
मायाळू लेक फार गुणांची
पण पाठवावीच लागते
तीला तीच्या सासरच्या घरी
ह् दय पिळवटून जातं
कंप शरीरात सुटतो
डोळे आपसूकच मग
अनावर वाहू लागतात
दाखवायचे नसते बापाला
दुःख आपल्याला झालयं
बाजूला जाऊन डोळे पुसताना
लेकीचाही बांध फुटतोय
सुखी रहावे हीच ईच्छा
असते प्रत्येक बापाची
बाबांची आठवण मनात जपत
जगत असते प्रत्येक मुलगी.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment