स्पर्धेसाठी
हायकू
विषय - वैशाख ऊन
वैशाख ऊन
तगमग जीवाची
आस छायेची । १ ।
तापला सूर्य
वरती शिरावर
लई पावर । २ ।
काहीली झाली
कासावीस हा जीव
खुळा सजीव । ३ ।
गरज आता
खूपच पावसाची
शांत पनाची । ४ ।
लावूया आता
वृक्षराज सगळे
होऊ मोकळे । ५ ।
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment