Tuesday, 1 May 2018

कविता ( महाराष्ट्राची व्यथा )

स्पर्धेसाठी

माझ्या महाराष्ट्राची व्यथा

आधुनिक माझ्या महाराष्ट्रात,
विकासाचे नगारे वाजतात .
जग जरी गेले चंद्रावर,
पायाभूत सोईस तळमळतात.

गातात पोवाडे विकासाचे,
चाळण उडालीय रस्त्यांची .
वीज पाण्या शिवायच ,
दशा झालीय वस्त्यांची .

आश्वासनांच्या महापुराने ,
जनता भारावून गेलीय .
पाच वर्षे संपता संपता ,
पदरी निराशाच आलीय .

मुंबई राजधानी महाराष्ट्राची ,
परप्रांतीय लोंढ्यात गुदमरते.
मुलभूत गरजांसाठी मग ,
जनता कासावीस होते .

विकास योजनांना सदा ,
ईथे उपेक्षाच माथी आली .
भ्रष्टाचार अन्यायाच्या खाईत ,
नकळत जनता लोटली गेली.

संपवण्या महाराष्ट्राची व्यथा ,
निपटारा सगळ्यांचा करण्यासाठी.
पेटून ऊठ तू मतदार राजा ,
हक्क तुझा मिळवण्यासाठी .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment