चित्रकाव्य स्पर्धेसाठी
खेळ गोट्यांचा
खेळ गोट्यांचा असा ,
मनापासून जो तो रमला .
रंगीबेरंगी काचगोलांच्या ,
डावात बालचमू दंगला .
कधी चिडीचा डाव तर ,
कधी डाव होई रडीचा .
अंदाज घेतात सगळे ,
पाडलेल्या त्या आडीचा .
लुप्त होत चाललेत ,
डाव हे मैदानावरचे .
मोबाईल च्या जमान्यात आता ,
झालेत सगळे गुलाम गेमचे .
खेळताना गोट्या मैदानात ,
आपसूकच कसरत होते .
गरज नाही खर्चिक जीमची ,
नांदी व्यायामाची ईथेच होते .
जरी भांडलो तरी एकत्र
बंधूभावाचा भाव जोपासतो .
तत्व कलहानंतर मग सगळे ,
मैत्रभावाने निवांत खेळतो.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता . शिरोळ ,
कोल्हापूर.
No comments:
Post a Comment