स्पर्धेसाठी
मुक्तछंद काव्य
विषय - मी परत येईन
जाता जाता सांगून जातो माय
मी नक्कीच परत येईन
नको चिंता , काळजी करु
हाय मी वाघ तुझा ढाण्या
संस्कार तुझेच घेऊन पाठी
निर्धार तुझा ह्रदयात माझ्या
आशिर्वाद हवा तुझा फक्त
काम फत्ते मी करून येईन
शत्रूला आसमान दाखवून येईन
मान तुझी अभिमानाने ताठेल
असेच कर्तृत्व करुन येईन
तोवर धीर दे तू बाबांना
सांभाळ तू माझ्या पिल्यांना ,
आणि तूझ्या या सुनेला ,
माझ्या लहान भावाला ,
आणि लाडक्या या बहीणीला
कमी नाही पडणार कधी कुणाला
भारतमातेचा आशिर्वाद आहे
देशरक्षण्या जातोय आता
सुपुत्र तुझा निधड्या छातीने
वाट पहात रहा तू कौतुकाने
येईन परत मी हा दावा आहे
कारण मी तूझाच वीरपूत्र आहे.
शत्रूलाही कोडं पडावं असचं
कर्तृत्व दाखवून येतो
येणाऱ्या पिढीला गर्व वाटेल
अशीच कामगिरी करुन येतो
येईन परत मी विश्वास आहे
आशिर्वाद सगळ्यांचा पाठीशी घेऊन निघालोय मी सिमेवर
लाव तू माथी कुंकुमतिलक
औक्षण कर तू हसत हसत
नक्कीच येतोय बघ परत
स्वागताला रहा तू दारात.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.
9881862530
No comments:
Post a Comment