Thursday, 10 May 2018

विडंबन काव्य ( भातुकलीच्या खेळामधली )

विडंबन काव्य / गीत स्पर्धेसाठी

मूळ गीत - भातुकलीच्या खेळामधली , राजा आणिक राणी

शिर्षक - भातुकलीच्या खेळामधली, छोटी एकच राणी

भातुकलीच्या खेळामधली
छोटी एकच राणी
अर्ध्यावरती डाव मोडला
अधुरी एक कहाणी   ।। धृ ।।

गुंड बोलला , मला मिळाली
छोटीशी ही पोर
तिच्या देहासवे खेळती
मानव नव्हे जणू ढोर

का राणीच्या डोळा तेव्हा
दाटून आले पाणी ?   ।। १ ।।
अर्ध्यावरती..........

राणी झाली हतबल तेव्हा
शरीराशी ते खेळताना
नाही ऊरला प्रतिकार तो
जीव जेव्हा जाताना

आईबापाला ऊशिरा कळली
मुलीची करुण कहाणी  ।। २ ।।
अर्ध्यावरती........

प्रश्न तिला हा पडला
का हे मला छेडतात
का जगात या फुलण्याआधी
कळी ही कुस्करतात ?

या प्रश्नाला ऊत्तर नव्हते
राणी केविलवाणी   ।। ३ ।।
अर्ध्यावरती.......

राणीचे ते मिटले डोळे
देवाच्या दारात
का तिचा हा श्वास कोंडला ?
सगळ्यांच्या मेळात

आसमंतात विरुन गेली
हाक तिची केविलवाणी  ।। ४ ।।
अर्ध्यावरती........

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.
9881862530

No comments:

Post a Comment