Monday, 30 April 2018

अभंग ( व्यसनाचा भस्मासूर )

राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धेसाठी

विषय - व्यसनाचा भस्मासूर

व्यसन जडले । मादक द्रव्याचे ।
वाईट नशेचे । मानवाला ।। १ ।।

वारंवार त्याचे । सेवन करतो ।
धुंदीत राहतो । तो व्यसनी ।। २ ।।

नशा ती चढते । विसरते नाती ।
दारु जे पीती । आपलीच ।। ३ ।।

भस्मासूर पहा । आज व्यसनांचा।
फास जीवनाचा । आवळला ।। ४ ।।

झाली हो चाळण । पहा शरीराची।
लाज ना कशाची । वाटायाची ।। ५ ।।

दारु अफू गांजा । तंबाखू कोकेन।
नको हेराँईन । या देहाला ।। ६ ।।

हो व्यसनमुक्त । घे जबाबदारी ।
तुझ्या शिरावरी । कायमची ।। ७ ।।

आगामी पीढीला । संदेश चांगला
करु देश भला । निर्व्यसनी ।। ८ ।।

रचनाकार
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड . ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment