Sunday, 22 April 2018

कविता ( वणवण )

काव्यस्पर्धेसाठी

फेरी क्र.    ०८

कोड क्र.  VBSS KP 13

विषय - पाणी

शिर्षक - वणवण

ऊजाड ओसाड माळावर ,
वणवण फिरते भरभर .

तापला सूर्यदेव माथ्यावर ,
मिळेना पाणी वाटीभर .

चिमुरडी माझी अनवाणी ,
पाण्याविना झाली दीनवाणी .

पाय भाजतात माझे आई ,
नाही चपला माझ्या पायी .

काळजी नको जाईन मी भरभर,
आणिन पाणी मी कळशीभर .

घे आता डोक्यावर तुझ्या हंडा ,
तुडवू आपण माळ हा फोंडा .

वणवण पाण्याची थांबावी ,
गरज जलसमृद्धीची भागावी .

बदलण्या मानसिकता लोकसहभाग हवा ,
मंत्र माणुसकीचा हा
अनमोल ठेवा .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment