स्पर्धेसाठी
आभाळागत माया
नाही अंत आभाळाला ,
वाटे टेकले क्षितीज .
पाहू जाता पुढे पुढे ,
जाई पुढेच जसे गतीज .
प्रेम आई बाबांचे असेच ,
जशी आभाळाची माया .
ना संपे ,ना आटे कधीच ,
शब्द अपुरे कौतुक गाया .
असाच राही वाहत ,
वात्सल्याचा अखंड झरा.
जसा वाहतो चोहीकडे ,
बेधुंद , आनंदी हा वारा .
दाटुन मळभ आल्या ,
धुंद पावसाच्या धारा .
मायबापाची माया जशी ,
सुखवी स्नेहाचा हा वारा .
सुखी ठेव देवा आता ,
मागणे एकच हे ऊरी .
संपन्न आरोग्याची कास ,
लाभो हीच प्रार्थना खरी.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment