स्पर्धेसाठी
काव्यांजली
विषय -- अनमोल
अनमोल आहे
नाते गुरु शिष्याचे
एकात्म भावाचे
सदोदित ( १ )
जपून ठेवा
ही आदराची नाती
अभिमानाने छाती
फुलावी ( २ )
स्त्री पुरुष
समानता नेहमी जपा
विषमतेला कापा
विनयाने ( ३ )
सन्मान करा
माता भगिनी नारीचा
सन्मान शिलाचा
करावा ( ४ )
सुरक्षित असावी
कोणत्याही वर्गातील नारी
स्त्रीत्वाची चोरी
नकोच ( ५ )
कर्तव्य आपले
सुजाण आम्ही नागरिक
जनतेचे पाईक
नेहमीच ( ६ )
चला उठा
आता लागा कामाला
धैर्य लेकीला
द्यावया ( ७ )
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment