Sunday, 1 April 2018

कविता ( मी तुमची अर्धांगिनी )

काव्यस्पर्धेच्या १० फेरी साठी

     स्पर्धेसाठी फेरी क्र. ०५

कोड नंबर-- VBSS KP १३

विषय - मी तुमची अर्धांगिनी

सागरात संसाराच्या दोघे ,
वल्हवायची नाव होती .
संसारवेलीवरील दोन फुलांची,
सजवायची रोज प्रित होती.

साथ तुमची या वेलीला ,
शेवटपर्यंत हवी होती .
आधाराची तुमच्या मला ,
खरंच खूप गरज होती .

रंगवली होती स्वप्ने खूप ,
यशस्वी जीवनाच्या वाटेवर .
डाव होता खेळायचा अजून ,
सोडून गेलास तू अर्ध्यावर .

आठवणीने रोज जीव कासावीस,
रोजच्या हुंदक्यांनी भरलाय गळा.
थोपवून अश्रूंना खोचलाय पदर ,
फुलवण्या हा माझा संसारमळा .

मी तुमची अर्धांगिनी नारी ,
बनलीय आता लेक सावित्रीची.
सारून टक्केटोणपे समाजातील ,
पार करतेय मी वाट प्रगतीची .

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.
९८८१८६२५३०

No comments:

Post a Comment