Friday, 30 March 2018

मन ( कविता )

काव्यधारा काव्यसमूह आयोजित महाकाव्य स्पर्धेसाठी

विषय -- मन

मन असते प्रत्येकालाच ,
व्यक्त करण्या आपले विचार.
ठरते व्यक्तीत्व सर्वांचे ,
जसे असतील तुमचे आचार .

मनामध्येच असतात सा-या ,
भावनांच्या विचारधारा .
व्यक्त करुन सुखी रहावे ,
हाच आहे विचार खरा .

नका दाबू विचार मनातले ,
प्रकट करा दिलखुलासपणे.
तणावरहित जीवन मग ,
जगा तुम्ही निरलसपणे .

असेल मन आनंदित तर ,
शरीर सुखाने नाचते .
नाही निमंत्रण आजाराला ,
आरोग्य ईथे सदा नांदते.

मनमयूर नाचू द्या मुक्तपणे ,
अभिव्यक्ती विचारांची होऊ द्या.
आनंदाने जगता जीवन ,
बेभान होऊनी जगी राहू द्या .

     कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.४१६१०६
९८८१८६२५३०

No comments:

Post a Comment