Wednesday, 21 March 2018

अष्टाक्षरी ( अशी असते कविता )

स्पर्धेसाठी

       अष्टाक्षरी

विषय - अशी असावी कविता

कशी असावी कविता ?,
प्रश्र्न मनाला पडले .
सहजच गोंधळले ,
शब्द मग ओघळले .

भावनांचा गोतावळा ,
विचारांचे ते वादळ .
शब्द नौका सागरात ,
शोधू लागली ओंजळ .

शब्दांजली प्रकटल्या ,
रित्या मनाच्या अंगणी .
शब्द फुले सुगंधीत ,
झाली मनाच्या कोंदणी .

प्रसवल्या वेदनांच्या ,
कळा सोसून कल्पना .
बाळ सुंदर जन्मले ,
नांव कविता ठेव ना .

आता कळले मजला ,
अशी असते कविता .
धन्य झाले मन माझे ,
तोच कर्ता करविता .

        कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर .

No comments:

Post a Comment