Thursday, 29 March 2018

बंधमुक्त खेळ ( कविता )

शब्दांकुर काव्यसमुहातर्फे प्रकाश वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त  काव्यस्पर्धेसाठी चित्रकाव्य

             कविता

शिर्षक --  बंधमुक्त खेळ

ना राम येथे ना रहीम ,
आहे फक्त मानवता .
खेळ खेळता क्रिकेटचा ,
गळून पडली जातीयता .

नको मैदान ना नियम ,
विटांचीच बरी यष्टी .
व्हायला नको कधीच ,
कुणी येथे दु:खी कष्टी .

आनंद मानू बंधुभावनेत ,
रमू सगळे या खेळात .
घेऊ स्नेहाने सगळ्यांना ,
आज आपल्या या मेळात .

टोलविताना द्वेषाचा टोला ,
प्रेमाने जग जिंकुया .
पकडण्या सुखाची खेळी ,
प्रयत्न पराकाष्ठा करुया .

ना भगवा ना पांढरा ,
आड येई आपल्या .
बंधमुक्त खेळ हा खेळू ,
जागवू बंधुता मनामनात .

  कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment