Thursday, 29 March 2018

आई ( कविता )

शीर्षक -- आई

माय माझी माझा अभिमान,
गर्व माझा माझी प्रेरणा .
वादळातल्या तारुला ,
देते पुढे जाण्यास चालना.

संकटे आली कीतीही ,
शब्द तीचे सात्वनांचे .
संघर्षातही उभारी देतात ,
बोल तीच्या अंतरीचे .

पडले कष्ट कीतीही ,
घडवण्या तीच्या मुलांना .
सहजच सोसते ती माता ,
धरुन पोटाला पिलांना .

कर्तव्य आपले नेकीने ,
करते सर्वांना सांभाळून .
जबाबदारी आता आपली ,
सांभाळू तीला जीव ओवाळून.

नका दाखवू वाट वृद्धाश्रमाची ,
नका पाहू परीक्षा ममतेची .
नाही थोर जगी आईशिवाय ,
अतुट माया ही मगझ्या आईची .

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment