Saturday, 24 March 2018

लेक लाडकी ( स्त्री - भ्रूणहत्या )

स्पर्धेसाठी

   फेरी क्र.   -- ४

     कोड क्र.--  VBSS KP 13

विषय -- स्त्री - भ्रूणहत्या

शिर्षक -- लेक लाडकी

प्रथा वाईट समाजातल्या ,
विचाराला मिळाली चालना.
हेच जीवन म्हणजे बाई का ?
मज नेमके उत्तर सापडेना.

लेक लाडकी घरी आली ,
पदरवाने घर पावन केले.
बापाचं काळीज आपसूकच ,
काळजीने विचार करु लागले.

वाचून व्यथा अन्यायाच्या ,
रोजच्याच त्या बलात्काराच्या.
फक्त आणि फक्त मादीच्या ,
चिंधड्या उडाल्या विचारांच्या .

जरी आदर्श माता झाल्या ,
सावित्री, अहिल्या, जिजाऊ .
कुणाच्या भरवशावर आता ,
लाडकीला मी बाहेर पाठवू ?

मन केलं दगडासारखं ,
चाहूल लागताच लेकीची .
चिरडून टाकली गर्भातच ,
होरपळ झाली हृदयाची .

    श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

कोड क्र.-VBSS KP 13

No comments:

Post a Comment