Sunday, 22 April 2018

कविता ( मी बंदिस्त )

स्त्री जीवनावर आधारित भव्य काव्यस्पर्धेसाठी

विषय - मी बंदिस्त

नारी मी बंदिस्त जगते ,
जीवन हे परावलंबी .
वाटत राहते नेहमीच ,
व्हावे मी स्वावलंबी .

पाहता समाजव्यवस्था आजची,
शहारते रोज माझे अंग .
मानसिकता पुरुषी पाहून ,
ऊडतात चेहऱ्यावरील रंग .

दिला धडा धैर्याचा मज ,
जिजाऊ अन् सावित्रीने .
पण पेटलीय आज जनता ,
वावरते ती वासनांधपणे .

बरे वाटतयं बंदिस्त जीवन ,
पाहून निरागसतेवरील बलात्कार.
कानही झालेत बहिरे आता ,
नाही ऐकू येत ते चित्कार .

मी बंदिस्त परंपरेतून ,
बाहेर येण्या धडपडतेय .
समाजकंटकांच्या टोमण्यांनी ,
आपसूकच घायाळ होतेय .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment