Monday, 23 April 2018

कविता ( गरज पुस्तकांची )

स्पर्धेसाठी

विषय - गरज पुस्तकांची

अज्ञानाच्या अंधःकारातून ,
ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्यास.
गरज आहे पुस्तकांची खास ,
जीवनमार्ग विकासाकडे नेण्यास.

पुस्तकच घडवतात मस्तक ,
सारासार विचार जागवतात .
संघर्षाच्या या दुनियेत ,
रस्ता यशाचा दाखवतात.

पुस्तकच आहेत खरे मित्र ,
एकाकीपणा आपला घालवतात.
दुःखात सुद्धा सुखाच्या ,
राजमार्गाचा दरवाजा उघडतात.

पुस्तकच आहेत मार्गदर्शक ,
विवेकबुद्धी जागृत ठेवतात .
नैतिकतेच्या झुल्यावर ,
अलवारपणे झुलवतात .

पुस्तकच आहेत आपला आरसा ,
मनातील भावनांच्या प्रतिबिंबांचा
गोंधळलेल्या मनावरील आवरण ,
बाजूला करणाऱ्या विचारांचा .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment