Tuesday, 3 April 2018

काव्यांजली ( अंगारकी )

स्पर्धेसाठी

विषय - अंगारकी

अंगारकी चतुर्थी
आली पहा मंगळवारी
नैवेद्य घरी
मोदकाचा

धरु उपवास
दुर्वा मोदक बाप्पाला
आनंदी जाहला
गजानन

पूजू गणेशाला
आकाशी चंद्र पाहू
आरती करु
गजवदनाची

जास्वंदीचे फुल
आवडे लाल रंगाचे
करु मंत्रांचे
उच्चारण

अग्निहोत्री ऋषी
भारद्वाजांनी हो दिला
पृथ्वीगर्भातून जन्मला
अंकारक

स्थान मिळे
त्याला ब्रम्हांडात मंगळाचे
महत्त्व पुण्यलहरींचे
मानवाला

करुन चंद्रदर्शन
भक्तजण उपवास सोडी
जेवणाची गोडी
सुखावते

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment