Tuesday, 29 May 2018

दर्पणकाव्य ( ख्वाईश )

दर्पणकाव्य

प्रतियोगीता के लिए

ख्वाईश

ख्वाईश
जीने की
ख्वाईश
तमन्ना पूरी होने की
ख्वाईश
जीवन के क्षेत्र में सफलता की
ख्वाईश
माँ-बापकी दुवाएँ ,साया हमेशा मेरे साथ रहने की
ख्वाईश
मेरे मन में हमेशा करुणाभाव,हमदर्दी,परोपकारवृत्ती, सहनशीलता रहने की
ख्वाईश

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

लेख तंबाकू विरोधी अभियान

     तंबाकू विरोधी अभियान

31 मई को जागतिक तंबाकू विरोधी दिन मनाया जाता है । तंबाकू और तंबाकूजन्य पदार्थोंसे लोग दूर रहे ,तंबाकू के दुष्परिणाम के बारे में लोगों को पता चले ईसलिए यह दिन मनाया जाता है।

  मानव एक समाजप्रिय प्राणी है । ईसे समूह में रहना पसंद है । समूह में रहकर एकदुसरे के आनंद और दुःख में शरीक होने की प्रथा प्रचलित है ।ईसीकारण मौजमस्ती के लिए , मन को , शरीर को आनंद देने के लिए वे मादक द्रव्यों को अपनाते है। मादक द्रव्य या नशीले पदार्थ । इसमें तंबाकू का ज्यादा उपयोग होता है जैसे बीडी , सिगारेट , हुक्का , जरदा , पानमसाला , चबाकर खानेवाली तंबाकू इ.का प्रयोग मानव करता है ।

धूम्रपान का ईतिहास देखा जाय तो वह 5000-3000 ई.पू.के पहले से है। प्राचीन काल में ईसे सुगंध के तौरपर जलाया जाता था।जिससे लोगोंको आनंद मिलता था । लेकीन धीरे-धीरे लोगोंको इसकी आदत सी हो गयी । बाद में इसकी आलोचना भी बडी मात्रा में हुई ,फीर भी यह लोकप्रिय होते गया । 1920 को धूम्रपान के कारण फेंफडें का कैंसर होता है ईसका पता चला ,और धूम्रपान विरोधी अभियान शुरु हुआ। 1050 में भी ईसके विरोध में खूब चर्चा हुई । 1980 में इसके वैज्ञानिक प्रमाण प्राप्त हुए ।

   तंबाकू का सेवन करना अब आम बात हो गई है। बीडी, सिगारेट या हुक्का पिते समय तंबाकू को सुलगाकर उसकी भाँप अंदर खिंच ली जाती है जो सिधा फेंफडोंमे जाता है और वहाँ की कोशिकाएँ ईस भाँप को शोषित करती है जिसके कारण डोपामाईन और एडोर्फिन का रिसाव होता है।ईसके बाद ह् दय गती , स्मृती और सतर्कता बढ जाती है और आनंदानुभूती का आभास हो जाता है,लेकीन ईस अनुभूतीसे जादा खतरनाक है ईसके शरीरपर होनेवाले दुष्परिणाम । किशोरावस्था या युवावस्था में ही जादातर लोग धूम्रपान की शुरुआत करतें हैं। प्रारंभिक अवस्था में आनंद की अनुभूती के कारण ईसीकाही दृढीकरण हो जाता है जो सकारात्मक सदृढीकरण के रुप में कार्य करता है। ऊसे वही अच्छा और सही लगने लगता है।और ईसीमें वह पूरी तरह से घुलमिल जाता है।ईससे बाहर आना मुश्कील हो जाता है।

  तंबाकू लोग अब अपने पास पाऊचोंमें रखने लगें हैं।ईसलिए वह हमेशा ऊनके पास रहती है और जब मन चाहे ऊसे वे चबाते है।कुछ लोग ईसका समर्थन यह कहकर करतें है की यह दाँतदर्द और कानदर्दमें औषधी के रुप में काम आता है।रेगिस्तान के लोग कहते हैं की तंबाकू से जुकाम ठीक हो जाता है। लेकीन लोग यह नही समझते की तंबाकू से लाभ की अपेक्षा नुकसान ही ज्यादा होता है।ईसलिए तंबाकू हमेशा आलोचना का भागी बना हुआ है। ओटोमन साम्राज्य के सुलतान मुराद चतुर्थ ने तंबाकू विरोधी अभियान को सबसे पहले शुरुआत की और तंबाकू पर प्रतिबंध लगाने की कोशिश की।बादमें अनेकोंने ईसके खिलाप आवाज ऊठाया जो आजतक जारी है।विकसनशील देशों में तंबाकू की खपत सबसे जादा है।

   बीडी,सिगार के पिने से फेंफडों को नुकसान पहुँचता है।ईसके अलावा सिगरेट, ईलेक्ट्रानिक सिगरेट,हुक्का, क्रेटेक्स,अप्रत्यक्ष धूम्रपान, पाईप धूम्रपान, रोल-योर-ओन,वेपोराईजर जैसे कई प्रकार से तंबाकू का सेवन कीया जाता है। तंबाकू में जो निकोटिन होता है जिससे शरीर को,फेंफडोंमे, आँतोंमें नुकसान पहुँचता है। ईसके साथ ह् दय रोग,दिल का दौरा पडना,कर्करोग, यकृत की बिमारी,टिबी,पक्षाघात, नपुंसकत्व जैसी बिमारीयाँ हो जाती है।डोपामाईन से प्रचुर मात्रा में न्यूराँन्स निकोटीन रिसेप्टर प्रवाहीत होता है,जिसके कारण धीरे-धीरे व्यक्ती कमजोर बनती है।शरीर के अंतरांगोंकी क्षमता क्षिण होने लगती है।कैंसर जैसा महाभयंकर रोग हो जाता है जिसमें प्राण तक जाने की नौबत आती है।

   नशाविहीन जीवन लोग जिए ईसलिए सरकार प्रयत्नशील है।भारत में तंबाकू के सेवनसे 10 लाख लोग अनेक प्रकारके रोगोंके कारण मर जाते हैं।महाराष्ट्र में साधारण तौरपर 36% पुरुष और 5% महिलाएँ तंबाकू और तंबाखूजन्य पदार्थोंका सेवन करते है।यह भयावह है।लोगोंको ईसका पता होनेपरभी वे ईस लत से बाहर नहीं आ रहे है।भारत सरकार और एनजीओ द्वारा भरकस प्रयास कीया जा रहा है, लेकीन यह तभी संभव है जब तंबाकू का सेवन करनेवाले ही ईसका ईस्तेमाल खुद के मन से छोड दें।तंबाकू को त्यागने की दृढ ईच्छा ऊनके मन में जागें ऐसी मनिषा मैं परमेश्वर के शरण में आकर करती हूँ।

करो न तुम नशा
ना सेवन तंबाकू का
नहीं तो अटल है
सर्वनाश तेरे जीवन का

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
9881862530

कविता (विरह )

काव्यप्रज्ञांजली समूह आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धा 2018

   फेरी क्र. 2          30/5/2018

विषय - विरह

आनंदाने व समाधानाने ,
चालले होते आयुष्य माझे .
संसारातील दोन फुलांसह ,
बहरत होते जीवन माझे .

नजर लागली का सुखाला ,
आनंदात असणाऱ्या जीवनाला ?
गेलास अवेळी , अचानक तू ,
वाटे बसली खिळ भविष्याला .

आठवणींने नयनी पाणी ,
सलते ह् दयी  ती वेदना .
साहू कीती निमूटपणे मी ,
मिळणाऱ्या या यातनांना .

अशांत मी , सैरभैर मी ,
वादळातील नांव जशी .
विरहात तुझ्या रे साजना ,
सावरु मी स्वतःला कशी ?

ये परतूनी गरज तुझी ,
भकास या सुनसान जीवनी .
फोडला मी टाहो आकांताने ,
जणू थरथरली ही धरणी .

सावरेन पण वेळ हवा ,
तुझ्याशिवाय जगी जगण्याला .
नाही जमले परतायला तरी ,
बळ दे संकटांशी भिडायला .

कोड क्र. DPASG 1196

कवियीत्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.

दर्पणकाव्य ( बहर )

स्पर्धेसाठी

विषय -बहर

बहर
आज नवा
बहर
वाटतो जीवनी रोजच यावा
बहर
दुःखात असलेल्या जीवांना सुख देउन जावा
बहर
येतो वसंतात आनंद देण्यास , जीवनी समाधान देणारा हवा
बहर
अशांत फुलांना, भावनांना , मनाला शांत करणारा ,दुसऱ्यांनाही सुगंधित करणारा असावा
बहर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.

Monday, 28 May 2018

द्रोणरचना

द्रोणरचना

         लग्नसमारंभात
        तू झालीस माझी
            सहवासात
            आलीस तू
              प्रेमात
               तूझ्या
                 मी

श्रीमती माणिक नागावे

षटकोळी ( नैराश्य )

षटकोळी

विषय - नैराश्य

सारासार विचार बाजूला
सारत असते नैराश्य
यातूनच मग घडतात
विवेकबुद्धी गहाण ठेवून
जीवन नकोसे वाटते
अनपेक्षित आत्महत्या होतात

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.

द्रोणरचना ( सोबत तुझी )

द्रोणरचना

      सोबत तुझी

      सोबत तुझी मला
        सतत लागते
          रे जगायला
           जीवनात
             मजला
               हवा
                तू
       

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

दर्पणकाव्य ( स्वानंद )

DaRपण

स्पर्धेसाठी

विषय - स्वानंद

स्वानंद
आनंद स्वतःचा
स्वानंद
स्वावलंबनाने केलेल्या आपल्या कामाचा
स्वानंद
कठीण प्रसंगी स्वतःहून घेतलेल्या आपल्या निर्णयाचा
स्वानंद
स्वकष्टातून जिद्दीने, स्वतःच्या प्रयत्नातून मिळविलेल्या आनंद देणाऱ्या यशाचा
स्वानंद
पाहून दुःख दुसऱ्याचे दुःखी होऊन लागलीच मदतीला पुढे येणाऱ्या स्वमनाचा
स्वानंद

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

Sunday, 27 May 2018

षटकोळी ( प्रेम )

स्पर्धेसाठी

षटकोळी

विषय - प्रेम

प्रेम असावे सर्वांचे
नेहमीच येथे एकमेकांवर
ईथल्या या निसर्गावर
प्रत्येक प्राणी पक्ष्यांवर
आपल्या धरणीमातेवर
फुलणाऱ्या प्रत्येक फुलांवर

प्रेम असावे मुलांचे
आपल्या प्रेमळ मातापित्यांवर
त्यांनी केलेल्या संस्कारावर
नको कमी पडायला
संस्कृती आपली भारतीय
अभिमान त्यांच्या शिदोरीवर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ति. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

दर्पणकाव्य ( स्वातंत्र्य )

स्पर्धेसाठी

दर्पण काव्य

विषय  स्वातंत्र्य

स्वातंत्र्य
माझ्या विचारांचे
स्वातंत्र्य
मिळालेल्या शिक्षणाच्या योग्य वापराचे
स्वातंत्र्य
समाजासाठी अंमलात आणणाऱ्या आपल्या निस्वार्थी कृतींचे
स्वातंत्र्य
हवे लोकशाहीत राहून लोकशाहीप्रमाणे  वागायला मिळणाऱ्या आनंदी मानवाचे
स्वातंत्र्य
प्रत्येकाला निर्भिडपणे त्याचे स्वतःच्या कल्पना , भावना मांडता येणाऱ्या त्याच्या विचारांचे
स्वातंत्र्य

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

Saturday, 26 May 2018

द्रोणरचना ( माता रमाई )

द्रोणरचना

        माता रमाई

    धन्य माता रमाई
      करुया प्रेमाने
       वंदन तीला
         जनतेने
         जानले
          जीने
            हो

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.

कविता ( माता रमाई )

राज्यस्तरीय काव्यस्पर्धेसाठी

विषय - माता रमाई

गरीबा घरची लेक रमाई ,
अकाली अनाथ झाली .
आई-बाप सोडून गेले ,
काका-मामांची कृपादृष्टी झाली.

लेक रमाई पत्नी भिमाची ,
अल्पवयातच जबाबदारी आली.
दुष्काळाने जरी होरपळली ,
स्वाभिमानाने मदत नाकारली.

झळ ना कधी पोहचू दिली ,
बाबासाहेबांना करुण रमाईने.
अथक परिश्रमाने नाही दमली,
संसार नेटका केला आईने.

निष्ठा, त्याग अन् कष्ट सतत ,
होते जीवनी सोबतीला .
समजूतदारपणाच्या साथीने,
योग्य स्थान दिले संयमाला.

ऊपाशी मुलांसाठी रमामातेचा,
जीव तीळतीळ तुटला .
डबा दागीन्यांचा मग तीने,
सहजपणे दिन हो केला.

धन्य ती रमाई,तीचे ते कष्ट ,
पोखरले शरीर सारे श्रमाने.
चिरशांती घेतली अखेरीस ,
वंदन माते माझे आदराने .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

द्रोण रचना ( बंधन )

द्रोण काव्यरचना

               बंधन

        बंधन समाजाचे
         तोडून निघाले
          जीवनातील
             समजले
              मर्मच
                मले
                 हो

              रचना
    श्रीमती माणिक नागावे
             कुरुंदवाड

Friday, 25 May 2018

दर्पण ( स्वप्न )

स्पर्धेसाठी

स्वप्न

स्वप्न
माझ्या यशाचे
स्वप्न
यशाकडे नेणाऱ्या उज्ज्वल भविष्याचे
स्वप्न
समाजसेवेतून निराधारांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद देण्याचे
स्वप्न
लेखणीतून समाजजागृती करुन अनेक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या लेखणीचे
स्वप्न
माझ्या मुलांना , माझ्या कुटुंबाला , विद्यार्थ्यांना यशाच्या उंच शिखरावर गेलेले पाहण्याचे
स्वप्न

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

द्रोण काव्यरचना

द्रोण काव्यरचना

धन्यवाद मनस्वी
  मानते सर्वांचे
   आनंदानेच
      करायचे
       स्वागत
        त्यांचे
          मी

        रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर

दर्पण ( सौभाग्य )

स्पर्धेसाठी

दर्पण काव्य

विषय - सौभाग्य

सौभाग्य
माझे अलंकार
सौभाग्य
कुंकुमतिलक शोभे सुंदर भालावर
सौभाग्य
मंगळसूत्र साक्ष देतसे सतत तीच्या गळ्यावर
सौभाग्य
हिरव्या चुड्याची ऐकून कीणकीण सहजच लक्ष जाते मनगटावर
सौभाग्य
असेल सोबत तर कुठल्याही परक्याची वाईट नजर जात नाही तिच्यावर
सौभाग्य

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 24 May 2018

मुक्तछंद काव्य ( मी परत येईन )

स्पर्धेसाठी

मुक्तछंद काव्य

विषय - मी परत येईन

जाता जाता सांगून जातो माय
मी नक्कीच परत येईन
नको चिंता , काळजी करु
हाय मी वाघ तुझा ढाण्या
संस्कार तुझेच घेऊन पाठी
निर्धार तुझा ह्रदयात माझ्या
आशिर्वाद हवा तुझा फक्त
काम फत्ते मी करून येईन
शत्रूला आसमान दाखवून येईन
मान तुझी अभिमानाने ताठेल
असेच कर्तृत्व करुन येईन
तोवर धीर दे तू बाबांना
सांभाळ तू माझ्या पिल्यांना ,
आणि तूझ्या या सुनेला ,
माझ्या लहान भावाला ,
आणि लाडक्या या बहीणीला
कमी नाही पडणार कधी कुणाला
भारतमातेचा आशिर्वाद आहे
देशरक्षण्या जातोय आता
सुपुत्र तुझा निधड्या छातीने
वाट पहात रहा तू कौतुकाने
येईन परत मी हा दावा आहे
कारण मी तूझाच वीरपूत्र आहे.
शत्रूलाही कोडं पडावं असचं 
कर्तृत्व दाखवून येतो
येणाऱ्या पिढीला गर्व वाटेल
अशीच कामगिरी करुन येतो
येईन परत मी विश्वास आहे
आशिर्वाद सगळ्यांचा पाठीशी घेऊन निघालोय मी सिमेवर
लाव तू माथी कुंकुमतिलक
औक्षण कर तू हसत हसत
नक्कीच येतोय बघ परत
स्वागताला रहा तू दारात.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.
9881862530

Tuesday, 22 May 2018

षटकोळी ( विश्वासघात )

विश्वासघात

विश्वासाचे नाते असते
नाजूक तेवढेच मजबूत
मिळवताना आयुष्य जाते
वेळ नाही लागत
विश्वासघात केल्यास एखाद्याचा
जीवन क्षणात संपते .

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , तख. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर

Monday, 21 May 2018

चारोळी ( व्यथा गोंजारलेली )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - व्यथा गोंजारलेली

अनाथाश्रमातील या अनाथांची
ऐकुया आज व्यथा गोंजारलेली
ऐकून येई डोळ्यांत पाणी लोकां
पण वंशजांनीच नाकारलेली .

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

Sunday, 20 May 2018

कविता ( माझा गांव )

स्पर्धेसाठी

विषय - माझा गांव

कृष्णा-पंचगंगेच्या तीरी ,
वसली ही नगरी छान .
कुरणांच्या विपुलतेमुळे ,
पडले कुरुंदवाड नांव हे छान .

नाही कमी पाण्याची ,
ना घरी धनधान्यांची .
सर्वसुखसंपन्न हे गांव ,
वाहते कृष्णामाई प्रेमाची .

सर्वधर्मसमभाव ईथे रुजला ,
बंधुभाव तो वाढीस लागला .
मशिदीत गणपती बसवला ,
सर्वांनी साजरा तो केला .

कृष्णाकाठची वांगी हो चवीची ,
नाही तोड याला कशाची .
बासुंदीची चवच न्यारी ,
वर्णू कीती महिमा चवीची .

राजेघराण्याचा राजवाडा होता.
थोर गायक ,जनक सर्कशीचे .
प्राचीन विष्णूमंदिर ईथे छान ,
स्वागत स्विकारा ईथे प्रेमाचे .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर

षटकोळी ( खेळ सावल्यांचा )

स्पर्धेसाठी

षटकोळी

विषय - खेळ सावल्यांचा

जीवनच्या या मेळ्यात
सुखदुःखांचा चाललाय रोज
सुंदर खेळ सावल्यांचा
उलगडत जीवनाचा पट
हळूहळू आकार घेणाऱ्या
मानवी मनातील कल्पनांचा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 19 May 2018

चारोळी ( संसाराचा गाडा )

संसाराचा गाडा

संसाराचा गाडा चालवताना
धीराने मी सामना करते
मापभर धान्य सुपात घेऊन
एकाग्रतेने कसपट बाजूला सारते.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.

Friday, 18 May 2018

चित्रकाव्य ( खेळ पाण्यातला )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

खेळ पाण्यातला

जीव झाला कासावीस ,
जरी तापल्या ऊन्हामध्ये .
नाही तमा मला कशाची ,
खेळतो मी पाण्यामध्ये .

झेप घेतली जोमाने ,
उंच ऊडी आनंदाने .
रमलो मी खेळामध्ये ,
झेपावलो स्वानंदाने .

उडवला चेंडू पायाने ,
नाही तमा ओल्या अंगाची.
भिजले जरी तन माझे ,
नाही तुलना या आनंदाची .

ह्रदयात ओलावा प्रेमाचा ,
मनी ओढ खेळण्याची .
नजर असे ध्येयावरी ,
जोम चेंडूला टोलवण्याची .

खेळ पाण्यामध्ये रंगला ,
सानिध्यात निसर्गाच्या .
आशा जिंकण्याची मनी ,
नाही आधीन मी कोनाच्या .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

चित्रकाव्य ( खेळ गोट्यांचा )

चित्रकाव्य स्पर्धेसाठी

खेळ गोट्यांचा

खेळ गोट्यांचा असा ,
मनापासून जो तो रमला .
रंगीबेरंगी काचगोलांच्या ,
डावात बालचमू दंगला .

कधी चिडीचा डाव तर ,
कधी डाव होई रडीचा .
अंदाज घेतात सगळे ,
पाडलेल्या त्या आडीचा .

लुप्त होत चाललेत ,
डाव हे मैदानावरचे .
मोबाईल च्या जमान्यात आता ,
झालेत सगळे गुलाम गेमचे .

खेळताना गोट्या मैदानात ,
आपसूकच कसरत होते .
गरज नाही खर्चिक जीमची ,
नांदी व्यायामाची ईथेच होते .

जरी भांडलो तरी एकत्र
बंधूभावाचा भाव जोपासतो .
तत्व कलहानंतर मग सगळे ,
मैत्रभावाने निवांत खेळतो.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता . शिरोळ ,
कोल्हापूर.

Tuesday, 15 May 2018

कविता ( बंदिस्त जीवन )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

शिर्षक - बंदिस्त जीवन

पाहते निरखून एका डोळ्याने,
बंदिस्त हे असे जीवन माझे .
केविलवाणा भाव असे त्यात ,
पण गाते गीत हे तुझे .

ढगांमध्ये आकाशांतील ,
व्यापलाय माझाच चेहरा .
पण या चेहऱ्यावरचे भाव ,
घुसमटवतोय हा पिंजरा .

सारुन मुखवटा सोशिकतेचा ,
बंधमुक्त मला व्हायचयं .
नको फक्त शोभेची बाहुली ,
स्वावलंबी मला व्हायचयं .

मुक्त जरी केशसंभार हा ,
वाऱ्याविना निस्तब्ध आहे .
स्वातंत्र्याविना अस्तित्व माझे ,
जीवंतपनी मरणप्राय आहे.

गुलामगिरीचा तोडून पिंजरा ,
मुक्त जगी या विहरायचयं.
बंदिस्त जीवन साखळदंडातले ,
फेकून दूर मला जगायचयं.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

Sunday, 13 May 2018

लेख ( रमजान ईद व भाईचारा )

रमजान ईद व भाईचारा

मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. तो समुहात , समाजात राहणे पसंद करतो.समाजात अनेक सणसमारंभ तो एकत्रितपणे मोठ्या ऊत्साहात साजरा करतो.भारतात विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येकाच्या धर्माचे व सणांचे महत्त्व आहे.यापैकीच एक सण म्हणजे मुस्लिम धर्मीयांचा अतिशय पवित्र समजला जाणारा रमजान सण.

मुस्लिम धर्मीय वर्षातून दोनदा ईद साजरी करतात.एक ईद- ऊल - फीतर व ईद-ऊल-जुहा.रमजान ईदला ईद-ऊल-फीतर असे संबोधले जाते. अरबीमध्ये ईदचा अर्थ आनंद असा होतो व फीतर म्हणजे दान करणे होय.आनंदाचे दान म्हणजेच ईद-ऊल-फीतर होय.या सणांमध्ये चंद्राला फार महत्त्व आहे. चंद्रदर्शन झाले की ईद साजरी केली जाते.यापाठीमागे ऊद्देश हा असतो की , जगभरातील सर्वच मुस्लीम एकाच वेळी ईद साजरी करावेत. ३० व्या रोज्यानंतर चंद्रदर्शन होते .मग रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

आनंद साजरा करणे , एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करणे हा या महान पर्वाचा ऊद्देश आहे. आपापसातील बंधुभावाची भावना वाढीस लागते. सणाच्या सुरवातीला घराची , परीसराची स्वच्छता केली जाते. त्यामुळे आरोग्य चांगले राहते.तसेच  उपवासामुळेही शरीरास फायदा होतो.या उपवासालाच अरबी भाषेत रोजा असे म्हणतात.

रमजानचा चंद्र अस्ताला गेल्यावर ईदचा चंद्र दिसू लागतो व त्याच्या दुसऱ्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते. या उपवासांमुळे शरीराची मनाची शुद्धी, आत्मशुद्धी होते.शरीरास त्यागाची सवय लागते.व मोहांपासून कठोरपणे कसे बाजूला रहायचे याचा पाठ मिळतो. गरीब - श्रीमंत , लहान- थोर ज्यांना जसे जमेल तसे रोजे केले जातात.रमजान ईदच्या दिवशी वातावरणात एक नवीन जोम , जोश व ऊत्साह भरलेला असतो.महिनाभर उपवासासाठी शक्ती दिल्याबद्दल देवाचे आभार मानले जातात. त्यासाठी प्रार्थना केली जाते. महीनाभर देवाच्या सान्निध्यात काढले जातात. देवाचे नामस्मरण , कुराणपठन , नमाज ,प्रार्थना करण्यात वेळ घालवून जास्तीत जास्त वेळ हा देवाच्या सहवासात घालवला जातो.

सकाळच्या नमाज व प्रार्थनेनंतर सर्वप्रथम गरजूंना , गरीबांना दानधर्म केला जातो , व त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान आनले जाते.मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो.यादिवशी नविन वस्र परीधान केले जाते. घरांमधील महिला मोठ्या उत्साहात शिरखुर्मा बनवतात व तो सगळ्यांना खायला देतात , वाटतात व आपल्या आनंदात सर्वांना सामावून घेतात.यावेळी शेवयाला महत्त्व असते. प्रार्थनेनंतर एकमेकांना प्रेमाने गळाभेट देतात.यादिवशी गळाभेट घेऊन भाईचारा वाढवला जातो. तो शत्रू आहे का मित्र हे पाहिले जात नाही. शत्रूला सुद्धा या दिवशी भाईचाराचा संदेश देत वैरत्व मिटवण्यासाठी गळाभेट घेतली जाते. बाकीच्या धर्मांतील लोक सुद्धा मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी येतात.

अशाप्रकारे भाईचारा वाढवणारा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

   लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.
9881862530

कथा ( तीच्या घरी सुखी राहुदे )

स्पर्धेसाठी

ग्रामीण कथा

शिर्षक - तीच्या घरी सुखी राहूदे

सूर्य मावळतीला चालला हुता . कडुसं पडायला लागलं हुतं.शेतावरची कामं आवरुन आयाबाया गावाकडं बिगीबिगी जायला निघाल्या. शेतकरी गडी आपली औजारं सावरत बैलगाडी हाकू लागली.बैलं दुडकत गावाकडं निघाली.त्यांच्या गळ्यातील घुंगुरमाळा गोड आवाज काढू लागल्या.घुंगरांच्या आवाजात त्यांच्या चालीला एक लय आली हुती .घरी जायची सर्वांनाच घाई हुती.दिवस बुडायच्या आत गावशिवारात एकेकजण येत हुता.गडी माणसं मधीच पारावर टेकत हुती अन् गप्पा मारण्यात दिवसभराचा शिण घालवत हुती .बाया हातपाय धुवून जरा अंगणात टेकल्या.ज्यांच्या सुना हुत्या त्यासनी आयता च्या मिळाला.ज्यांच्या नव्हत्या त्यांनी थोड्यावेळाने करुन पीला.मग सुरु झाली सांजच्या सैपाकाची तयारी.जेवणखाण झालं का मग सगळ्या आयाबाया अंगणात येऊन बसायच्या व ऊशीरपातूर गप्पांचा फड रंगायचा.

गावात सातवीपतूर शाळाअसल्यामुळं बऱ्याच पोरी सातवीनंतर घरीच काम शिकायच्या.एकमेकांच्या घरी जाणयेणं असायचं .सुशी , पिंकी , कमली ,शरी शबाना , आशिया ई. आपसात खेळत.पोरबी त्यांच्याबरोबर खेळायची.सगळच आलबेल चाललेलं.त्यांच्यातीलच एक म्हणजे सातवी झालेली
शबाना अल्लड वयातील पोर.घरच्या परिस्थिती मुळं जास्त शिक्षण घेता न आल्यामुळं घरीच आईला कामात मदत करत असे.कशाची दगदग ना घाईगडबड , त्यामुळे निवांत सगळे चालायचे . दुपारचा वेळ कामाची आवराआवर झाल्यावर सगळे आरामात असायचे , कुणी वामकुक्षी घ्यायचे.पडवीत झोपियचे

शबाना मग कधी घरात दूरदर्शनवर कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवी कींवा शेजारच्या काकूंच्या घरी जाई.सुनील वीस वर्षाचा देखणा तरुण.बोलायलाही छान होता.तसे दोघेही अल्लड वयातीलच .दोघेही एकमेकांशी बोलायची . गप्पा मारायची. हळूहळू दोघांना एकमेकांबरोबर बोलणं , सहवास चांगला वाटू लागला .मग दोघांच्या नजरेची भाषा व भावनांची देवाणघेवाण नकळत सुरु झाली. दोघेही हळूहळू एकमेकांकडे ओढले जाऊ लागले. सुनील च्या घरी शबाना चे येणेजाणे वाढलं.
माळ्यावर पिकायला टाकलेलं आंबा जसा पिकत होता अगदी तसच सुनील आणि शबाना च प्रेम गोड होत होतं..जशी झाडावरच्या चिंचे ची गोडी लागावी तशी गोडी सुनील ला लागत होती..गावातून हिंडून फिरून दमून आलेला सुनील शबाना दिसली की अगदी चिंचेच्या झाडागत मोहरून जायचा.. खेड्यातल् हे उनाड प्रेम मोगऱ्यारखं फुलत होतं

सुनिल ची आई विधवा स्त्री , चार घरची भांडी , धुणी करुन मुलांना तीने वाढवले हुतं .तीला आपल्या मुलांकडनं खूप अपेक्षा होत्या. बापाचे छत्र नसलं की धाक दाखवायला कुणी नसलं तर मंग मुलं अंदाज घेत्यात व नकळत ती वाईट मार्गाला लागत्यात. त्यांच्यावर योग्य वेळी अंकुश नाही ठेवला तर कालांतराने ती निर्ढावत्यात व नंतर हाताबाहेर गेले की आवरता आवरत नाहीत.पण आईने जर योग्य वेळी खंबीर होऊन कडक निर्णय घेतले तर मुलांना जरब बसते.याचाच फायदा सुनील च्या लहान भावाने घेतला.त्यो वाईट संगतीला लागला  चोऱ्या माऱ्या करु लागला. पोलीस एकदादोनदा घरी येऊन गेलं.आजूबाजूला बदनामी झाली.सुनील ने त्याला वडीलकीच्या नात्याने खूप समजावून सांगितलं, पण सारे व्यर्थ गेलं.

याचा परिणाम व्हायचा त्योच झाला. त्यो असा झाला की शबाना च्या घरचं तीला त्या घरी पाठवनास झालं. आता दोघांच्या भेटी होत नव्हत्या.दोघांच्या ही नकळत प्रीतफुलाचा सुगंध दरवळत हुता.त्यानला एकमेकांची ओढ लागली हुती. पण भेटणार कसं ? प्रश्न निर्माण झाला. मग काहीतरी कारण काढून बाहेर जाऊन ऊभं राहू लागले. माळावर , देवळाच्या मागं एकमेकांशी भेट घेऊ लागले.मावळतीच्या सूर्याला साक्षी ठेवून आणाभाका,शपथा घेतल्या जाऊ लागल्या.मोगऱ्याच्या फुलागत शबाना सुनीलला मोहवू लागली.तोपण वेड्यासारखं तीच्या मागं मागं करु लागला.

शबाना च्या घरच्या लोकांच्या नजरेस ही गोष्ट आली.मग काय तीच्यावर बंधनांचा डोंगर आला.सतत पाळत ठेवणं आलं.प्रेमांकुर अजूनच रुजत हुता.प्रेम हे स्प्रींगाप्रमाणे असतं.त्याला जेवढं दाबाल तेवढं ते जास्त वेगाने ऊसळतय.तसेच दोघांचबी झालं.एकमेकाबद्दलची अनावर ओढ शांत बसू देत नव्हती. भर ऊनात तापून आल्यावर सावलीची अपेक्षा आसते न नाही मिळाली की तगमग जास्तच वाढते.अगदी तसच या दोघांचही झालेलं .समाजबंधनामुळे ते भेटू शकत नव्हते.मग त्यांनी घेतला एक भयंकर निर्णय .घरातून पळून जाण्याचा.!!!दिवस ठरला ,!! वेळ ठरली . !!

शबाना आईबरोबर बाहेर गावच्या बाजारात गेली हुती . ठरलेल्या वेळी सुनील गाडी घेऊन ऊभा राहीला. फोन तीच्याकडे नव्हता .संपर्क कसा साधणार ? त्याने खूप वेळ वाट पाहीली.शेवटी तो तिथून निघाला.आईबरोबर फीरताना बैचैन शबानाने गर्दिचा फायदा ऊठवत आईपासून बाजूला होण्यात यहस्वी  झाली. गडबडीने एका फोनच्या दुकानात जाऊन सुनील ला फोन लावला.त्याचे नियोजन सगळे कोलमडले हुते.तरीपण तो आला .दोघांची भेट झाली .आता वेळ घालवण्यात अर्थ नव्हता . व दोघं मिळून गाव सोडून निघाले. धाडशी निर्णय ! कुठे जायचे ? काय खायचे ? सर्व प्रश्न गौण होते यावेळी.

शबानाच्या आईने आरडाओरडा केला.नवऱ्याला कळविलं. ती डोकं बडवून घेऊ लागली.तीचा तो आकांत ऐकायला शबाना कुठं हुती ? ती निघाली हुती एका अनिश्चित अशा प्रवासाला.!!गांव तसं छोटच हुत पण बाजाराचा दिवस असल्यामुळं गर्दी खूप हुती.शबानाचे वडील आपल्या सवंगड्यांना घेऊन आलं.शोधाशोध झाली, पण व्यर्थ ! शेवटी रितसर पोलीसांत तक्रार नोंदवण्यात आली.

पोलिसांनी तपासचक्रे वेगात फीरवली .दुसऱ्या च दिवशी सुनील च्या एका मित्राच्या घरातून दोघांना पकडून आणलं गेलं.दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हतं.शबानाचे वडील ,त्यांचे मित्र व नातेवाईकांच्याबरोबर पोलीसस्टेशनमध्ये आले.त्यांचा तो अवतार पाहील्यावर शबानाने सांगितलं की मी जर घरी गेले तर मला वडील मारून टाकतील.मला सुनीलबरोबरच रहायचे आहे.पोलीसांनी समजावून सांगितले. वडीलांच्या समोर तीला आश्वस्त केल.खूप मिनतवाऱ्या करुन शेवटी ती घरी जायला तयार झाली.तीचं लग्न सुनीलबरोबरच करु पण नंतर ,असे सांगून तीला घरी नेण्यात आलं.

सुनीलला अज्ञान मुलीला पळवल्याबद्दल शिक्षा झाली. तुरुंगवास झाला.भविष्य अंधारात बुडालं.पण आता ऊपयोग काय ?काही महीन्यानंतर शबानाचे त्यांच्याच जातीत लग्न लावून दिल गेलं.तीने खूप विरोध केला पण काय ऊपयोग झाला नाही. सुनीलला हे जेव्हा कळाले तेव्हा त्याला खूप दूःख झाले. पण तो समझदार हुता.त्याने शबानाला आपल्या मनातच ठेवले.प्रदर्शन केलं नाही. तेवढा शहाणपणा दाखवला.

मध्ये एकदा दोनदा शबानाने सुनीलला फोन करुन बोलण्याचा प्रयत्न केला पण यावेळी सुनील ठाम राहिला. तो म्हणाला, "तुझ्या घरी तू सुखी रहा "

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.