स्पर्धेसाठी
अभंग काव्यस्पर्धा
विषय - सच्चा पोलीस शिपाई
कर्तव्यदक्ष सेनानी ।
देशप्रेमात रंगूनी ।।
देशभक्त हा म्हणूनी ।
ओळख समाजात ।। 1 ।।
दक्ष असे जीवनात ।
शांती ठेवी समाजात ।।
जरब ती आवाजात ।
आपसूकच येई ।। 2 ।।
ना अन्न ना पाणी याला ।
ना चुके तो कर्तव्याला ।।
भीत नाही मरणाला ।
बेधडक तत्पर ।। 3 ।।
ना सणवार पाहिला ।
नाही वेळ कुटुंबाला ।।
कीती यातना जीवाला ।
हसण्यावारी नेतो ।। 4 ।।
ध्येय एक देशसेवा ।
नको कुठलाच मेवा ।।
जातो सत्याच्याच गावा ।
वंदन करु चला ।।5 ।।
सच्चा पोलीस शिपाई ।
प्रार्थू याचीच भलाई ।।
वंदनीय ही सच्चाई ।
अभिमान आमचा ।। 6 ।।
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment