Wednesday, 15 August 2018

कविता चित्रकाव्य ( माझा झोका )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

माझा झोका

श्रावणातील या सुंदर समयी,
झूला मी झुलते आनंदाने .
मुक्त मी ,बेबंद मी आज ,
सोसलं आजवर खूप संयमाने.

वृक्षराज माझा सखा ,
भाऊराया आधार देतो मला.
अंगाखांद्यावर त्याच्या खेळून ,
रिझवते यला अन त्याला .

सूर्यप्रकाश साथीला येतो ,
सुवर्णप्रकाश सुंदर पसरतो.
वाटते मज भाग्य उजळले,
ऊंच माझा झोका जातो .

कूंतलभार हा असा झेपावला,
हवेशी गप्पा करु लागला .
गुज मनीचे सांगून गेला ,
अलवार झोके घेऊ लागला.

आसमंत ऊजळला सोनेरी,
प्रतिबिंब त्यात उठून दिसते.
मुक्तमनाने आनंदाने नार मी,
एकटीच मुक्तपणे झोके घेते .

प्रतिक मी नवयुगाची ,
प्रेरणादायी  सर्वांना मी .
नको भिक अन् सहानुभूती,
आत्मनिर्भर दिसूदे जगाला मी.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
9881862530

No comments:

Post a Comment