Friday, 3 August 2018

कविता ( ग्रामीण जीवन ) शेतकरी राजा

घे भरारी महास्पर्धा ( पर्व दुसरे )

काव्यफेरी -- 2

विषय -- ग्रामीण जीवन

शिर्षक --- शेतकरी राजा

चल ग सखू बिगीबिगी ,
तांबड फुटलय आकाशात .
आवर तुझी सकाळची कामं,
जायचय आपल्याला रानात.

ढवळ्या पवळ्या हंबरतात ,
बोलवतात बघ गोठ्यात .
शेणघाण काढून स्वच्छ करु ,
चारा टाकायचाय पुढ्यात .

जुपलीय बघ बैलजोडी ,
सुंदर आपल्या बैलगाडीला.
घुंगुरमाळा छमछम वाजती ,
चल जाऊ आता रानाला .

पारावर बसली चौकडी ,
चौकशा सुरु झाल्यात .
पाण्याला घागर कमरेवर ,
आक्का , काकू निघाल्यात.

रानात राबून धान्य पीकवून,
घरसंसार आपला वाढवायचय.
गरीबी आली पदरी तरीही ,
धिरान आपल्याला जगायचयं.

कोड क्रमांक -- GB1191

No comments:

Post a Comment