Sunday, 12 August 2018

आठोळी ( श्रावण )

स्पर्धेसाठी

आठोळी

विषय - श्रावण

हिरवाईचे लेणे लेऊन आज
धरणीमाता सजून फुलारली
बरसतच श्रावण आला दारी
सारी सृष्टी आपसूक मोहरली

श्रावणातल्या जलधारांनी कशी
आसमंती इंद्रधनू रेखाटले
ऊनपावसाचा खेळ हा चालला
रिमझिम धारांनी रोमांच आले.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment