Tuesday, 7 August 2018

अभंग रचना ( माझी आई माझी शान )

उपक्रम

अभंग रचना

माझी आई माझी शान

माझी आई माझी शान ।
वाटे मला अभिमान ।।
गाते तीचे गुणगान ।
लेक तिची लाडकी ।।1।।

सतत मग्न कामात ।
मुलांचे यश मनात ।।
ठेवते आई ध्यानात ।
काळजी हो मुलांची ।।2।।

लक्ष तिचे मुलांवरी ।
छाया त्यांच्या शिरावरी ।।
आयुष्यभर ती धरी ।
नकळतपणे हो ।।3।।

वैभव आहे घराची ।
सहनशील मनाची ।।
घ्या तुम्ही काळजी तिची ।
आयुष्यभरासाठी ।।4।।

धीर सदा मला देते ।
लढायला शिकवते ।।
संघर्षात बळ देते ।
जीवनात माझीया ।।5।।

वंदन हे तिच्या पायी ।
आदरच माझ्या ठायी ।।
गुणगान तिचे गाई ।
नतमस्तक आहे ।।6।।

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.

No comments:

Post a Comment