Tuesday, 7 August 2018

कविता ( माझी कर्मभूमी )

स्पर्धेसाठी

माझी कर्मभूमी

अभिमान आहे मला ,
माझ्या कर्मभूमीचा .
कुरुंदवाड नगरीचा ,
तिच्या नावलौकिकाचा .

कृष्णा पंचगंगा येथे ,
वाहती निखळ प्रेमाने .
संगमभूमी पवित्र आहे ,
दत्तप्रभूंच्या आशिर्वादाने.

खवा,बासुंदीला आहे ,
मागणी मोठ्या प्रमाणात .
वांगी ही कृष्णाकाठची ,
प्रसिद्ध या महाराष्ट्रात .

जनक सर्कशीतले ईथले ,
जाणकार संगीताचेही थोर .
जन्मस्थान स्वातंत्र्यवीरांचे ,
पैलवानंचाही आहे जोर .

साहित्यिकांची मांदियाळी ,
क्रिडानगरी ऊत्साहाची .
सुजलाम् सुफलाम् आहे ,
आस सदोदित यशाची .

कवियत्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment