उपक्रम
अभंग
विषय -- माझे मन रंगी देवा
करतो तुझाच धावा । ओळख तू माझ्या भावा ।।नाही मनी कसा कावा । ओळख तूच आता ।।1।।
माझे मन रंगी देवा । करतो तुझाच धावा ।। भक्तीत रंगून जावा।। कामना भक्ताची या ।। 2 ।।
मैत्री तुझी नी माझीच । टिकायला ती हवीच ।। प्रयत्न रे करुच ।।3।
रुप तुझे मी पाहिले। भान माझे हरपले ।। संसार हा विसरले । चित्त स्थीर होऊदे ।। 4 ।।
शांती लाभू दे मनाला । चैन येईल जीवाला ।। होऊ तयार क्षणाला । विश्वबंधुत्वासाठी ।। 5 ।।
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment