काव्यप्रेमी शिक्षक मंच,पुणे आयोजित राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्यस्पर्धेसाठी
विषय - आई- एक गुरु
अभिमान माझा आई ,
आहे शान कुटुंबाची .
आशीर्वाद हवा तिचा ,
हीच ईच्छा सगळ्यांची .
गुरु आहे घरातील ,
ज्ञान देते ती आम्हाला.
नाही पैसा ना अपेक्षा,
निरपेक्ष ती कामाला .
उपदेश तिचा आहे ,
उपयोगी घरीदारी.
आली संकटे कीतीही,
कदापीही ती न हारी .
सावरते ती सर्वांना ,
धैर्य तिचे अनोखेच .
गर्व तिचा नेहमीच ,
आम्ही पाखरे सुखीच .
वंदनीय नित्य मला ,
नमस्कार माझा असे .
मनी माझ्या नेहमीच,
प्रोत्साहन देत असे .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment