Sunday, 5 August 2018

कविता (मैत्रीचा परीस )

काव्यलेखन स्पर्धेसाठी

विषय - मैत्री

मैत्रीचा परीस

सोन्यासारखी मैत्री आपली ,
अशीच नेहमी राहूदे .
मैत्रीच्या या नात्यात ,
गोडवा असाच टिकु दे.

आधार आपण एकमेकांना ,
संघर्षाच्या या दुनियेत .
संवेदना आपल्या जागृत ठेऊ ,
बोथट झालेल्या माणुसकीत.

मानवता शोधत फीरतोय ,
जो तो या राक्षसी जगात .
मीत्रत्वाच्या नात्याने ,
घेऊ हात आपल्या हातात .

हाक हवीय विवेकाची ,
बुद्धी जागृत करायला .
मैत्रीचा परीसच ऊजळेल ,
तावून सुलाखून विश्वासाला.

विश्वासच मैत्रीचा परीस,
नाही तुटायची कधीही .
जपूया नाते अखंड ,
संकटे आली तरीही .

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

No comments:

Post a Comment