स्पर्धेसाठी
सामर्थ्य आहे तुझ्यातही
आहे पुरावा तुझ्या महानतेचा,
जगी थोरवी गाती सकलजन.
सामर्थ्य आहे तुझ्यातही नारी,
नको समजू स्वतःला हीन.
आदर्श तूझ्यासमोर असती,
माता जिजाऊ अन् सावित्री.
पुरातनकालापासून झालीय,
महान तुझ्यामुळेच ही धरीत्री.
नाही परके क्षेत्र तूला कुठले,
ओळख स्वतःला हे मोहीनी.
सामर्थ्याने तूझ्या हिमतीच्या,
घाल गगनाला गवसणी.
गार्गी , मैत्रेयी विदुषी महान,
देती विद्वत्तेचे ज्ञान राजदरबारी.
कल्पना, सुनिता अवकाशयात्री,
घेतली त्यांनी गगनभरारी.
चल पुढे ,चाल तू यशाकडे ,
नको घेऊ माघार यशस्वीनी.
तेजाळू दे जीवन तुझे नारी,
तूच झाँसी, तूच मर्दानी.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment