चारोळी लेखन स्पर्धेसाठी
विषय -- लक्षण
1
लक्षण बालपणीचे पाहून
अंदाज भविष्याचा वर्तती
बाललीलांचे कौतुकच फार
तरुणपणी अंचभ्यात पाडती
2
लक्षण हुषार विद्यार्थ्यांचे
ओळखतात गुरुजनवर्ग
टवाळखोर शिष्यांपासून
होतोय कायम उपसर्ग
3
लक्षण सुगरण नारीचे
स्वैपाकघरातून प्रकटते
पोटोबा शांत कुटुंबियांचा
तरच तीला नावाजले जाते
4
लक्षण खऱ्या देशभक्तीचे
संकटकाळी दिसून येते
भाषणबाजी सगळेच करतात
कृतीत शून्यता दिसून येते
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
No comments:
Post a Comment