Saturday, 11 August 2018

काव्यांजली ( ओळख )

राज्यस्तरीय काव्यांजली काव्यलेखन स्पर्धेसाठी

विषय-  ओळख

ओळख हवी
आपणा सर्वांना एकमेकांची
तमा नात्यांची
असावी

ओळख होते
जीवनाच्या प्रवाहात आल्यावर
सहजच भेटल्यावर
आपोआप

गुरु शिष्यांना
गरज समजून घेण्याची
स्वभाव ओळखण्याची
परस्परांचा

समाजाने ओळखावे
साव का साधू
आहेत संधीसाधू
अनेक

गरज प्रत्येकाला
ओळखून जगात वावरण्याची
सुखात राहण्याची
नेहमीच

ओळख जगाची
असावी सुजाण नागरिकांना
प्रकटावे विचारांना
विचाराअंती

ओळख वादाची
समजावून सांगू सर्वांना
खऱ्या कारणांना
समजवायला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment