षटकोळी
सुप्रभात
मंगलमय वातावरण घेऊन
आली प्राचीवरुन सुप्रभात
दशदिशा उजळल्या तेजाने
जाग चरारचराला आली
भूपाळीच्या मधूर स्वराने
आसमंत फुलला आनंदाने
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
षटकोळी
सुप्रभात
मंगलमय वातावरण घेऊन
आली प्राचीवरुन सुप्रभात
दशदिशा उजळल्या तेजाने
जाग चरारचराला आली
भूपाळीच्या मधूर स्वराने
आसमंत फुलला आनंदाने
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
मस्ती में ही जीना चाहिए
वरना क्या मजा जिंदगीका
लुफ्त उठाना सिख ले बंदे
कोई भरोसा नहीं आदमीका.
रचना
श्रीमती माणिक नागावे
उपक्रम
फुलपाखरू
चाखत मधुरस मोदभरे
फुलपाखरू उडते फुलांवरुन
रंगबिरंगी काया तुझी रे
वाटे पहावे हाती धरुन.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
आनंद
क्रीयाशिलतेतही आनंद वेगळा
हास्य समाधानी चेहऱ्यावर
मृतिकेतही प्रतिकृती हुबेहुब
मोबाईल शोभे हाती खरोखर
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
चारोळ्या
विषय - पिढी आमची
( 1 )
पिढी आमची नशीबवान
सन अडुसष्ठच्या काळातली
होता विश्वास स्वता:वर
आईवडीलांच्या आज्ञेतली
(2 )
पिढी आमची सुखाची
गुरुजनांचा आदर ठेवणारी
संवेदनशील हृदयाची
एकमेकांना विचारणारी
( 3 )
पिढी आमची भाग्याची
सकस ज्ञान मिळवणारी
नव्हता बाजार शिक्षणाचा
संस्कारी ज्ञान मिळवणारी
( 4 )
पिढी आमची आदर्शवादी
मोठ्यांचा मान राखणारी
नवनीतपेक्षा पुस्तकांवरच
अधिक भिस्त ठेवणारी
( 5 )
पिढी आमची सोशिक फार
कींमत होती स्वकर्तृत्वाला
स्वयंशिस्त अंगी बाणलेली
तयार कोणत्याही कष्टाला
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर
षटकोळी
स्वप्न
स्वप्न माझे भंगले
ऊदास मन जाहले
निस्तेज मनाच्या भावना
आशेचे छाटले पंख
अस्वस्थता शांत होईना
अश्रू डोळ्यातील थांबेना
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
काव्यांजली
विषय - वेड सेल्फीचे
आजच्या जमान्यात
सगळीकडे वेड सेल्फीचे
धुंद तरुणाईचे
दिसते
मग्न आहेत
मोबाईल मध्ये सगळे
दृश्य आगळे
पाहतो
विसरली माणुसकी
यंत्राच्या या युगात
भरली मनात
असंवेदनशीलता
बोलणे बंद
थांबल्या प्रत्यक्ष भेटी
कुटुंबात कटकटी
दिसतात
वेड सेल्फीचे
नादावला हा तरुण
गेलाय भेदरून
समाज
हकनाक जातो
जीव या सेल्फीपायी
असा वेदनादायी
बदल
वेडात सेल्फीच्या
नाही भान समाजाचे
प्राबल्य विकृतीचे
वाढले
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
राज्यस्तरीय आठोळी स्पर्धेसाठी
ओवाळिते भाऊराया
रक्षाबंधनाच्या दिनी मी
आज ओवाळिते भाऊराया
प्रेम , जिव्हाळ्याचा क्षणी या
बहिण तयार राखी बांधाया
रक्षण्या बहिणीला सदैव
बंधुराया माझा मान देऊन
आयुरारोग्य प्रार्थते त्याचे
औक्षण ,कुंकुमतिलक लावून
रचना
श्रीमती माणिक नागावे
जिल्हा. कोल्हापूर
जिंदगी
रुठ जाओ तुम बेशक
मनाने के लिए है हम ।
उम्र की मत सोचो
मन की अपनी मानो ।
भरोसा रखो जिंदगीपर
नजदिकीयाँ तो बनती रहेगी ।
हमारा एहसास ही काफी है
बस याद करते रहना ।
ऐ जिंदगी तो आनी जानी है
लुफ्त उसका ऊठाते रहना ।
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
चित्रकाव्य स्पर्धेसाठी
दिवस पावसाचे
दिवस हे पावसाचे ,
जलधारांना झेलण्याचे .
चिंब चिंब भिजण्याचे ,
मोठ्यांकडून रागवून घेण्याचे.
नको भिजायला पावसात ,
बेगमी प्लॅस्टिक ची केली.
नको पोरं भिजायला ,
म्हणून शरीरावर पांघरली .
चालली सायकल रस्त्यावर,
नारा देत पर्यावरणाचा.
वापरु सर्वजण रोज,
अर्थ खरा संदेशाचा.
स्वार होऊन सायकलवर,
बिनधास्त स्वारी निघाली.
अंगी रेनकोट छान दिसे,
लाल पँन्ट ती शोभली.
पण भिती एक मनी ,
नको गुदमरायला मुले.
श्वासाला येईल अडथळा,
विचार करा कुठं चुकले ?
वृक्षसखा सावलीसाठी ,
उभा आहे स्वागताला.
हिरवीगार पाने आता,
शोभतात श्रावणाला.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
ख्वाबोंका तो क्या कहना
ना जीने देते हैं न मरने
आजकल दुनियामें
पराये भी लगने लगे हैं अपने
रक्षाबंधन , पवित्र सण
भारतीय संस्कृती संपूर्ण जगात वेगळी आहे, कारण भारतात अनेक धर्माचे लोक राहतात. जे ईतर देशांमध्ये दिसत नाही. प्रत्येक धर्माचे लोक आपापले सण मोठ्या ऊत्साहात साजरा करतात.भारतात अनेक सणांची रेलचेल आहे. विविधतेत ही एकता ही भारताची विशेषता आहे.
रक्षाबंधन ह्या सणाचे एक वेगळेच महत्त्व आहे. भावाबहिणींच्या प्रेमाच्या नात्याने हा बांधला गेला आहे. यामध्ये प्रेम,स्नेह व संवेदना भरलेली आहे. हिंदू व जैन धर्मामध्ये हा सण मोठ्या ऊल्हसित वातावरणात साजरा करण्यात येतो.या दिवशी बहिण सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन कपडे परिधान करून आरतीची थाळी सजवते.पाटाभोवती रांगोळी काढून पाट मांडते व भावाला त्या पाटावर बसवून त्याला कुंकुमतिलक लावते,अक्षता लावते,डोक्यावर अक्षता टाकते.भावाच्या ऊजव्या हातात राखी बांधते.त्याचे औक्षण करुन त्याला मिठाई खायला देते व त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुखी जीवनासाठी प्रार्थना करते,व आपले रक्षण कर अशी कामना करते.भाऊ मोठा असेल त्याला नमस्कार करते व त्याचा आशिर्वाद घेते.भाऊ मोठा असेल तर तो आपल्या बहीणीला नमस्कार करून तिचा आशिर्वाद घेतो.भाऊ आपल्या बहीणीला भेटवस्तू देतो व तिला खूष करतो.प्रत्येक भावाचे हे कर्तव्य आहे की आपल्या बहीणीला खूष ठेवणे व तिचे रक्षण करणे व तिच्या आयुष्यात कधीही दु:ख येऊ न देणे.यादिवशी बहीण कींवा भाऊ एकमेकांकडे जातात व हा सण साजरा करतात.
रक्षाबंधन सण साजरा करण्यापाठीमागे अनेक कारणे आहेत. यामध्ये पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक कारणें आहेत. पौराणिक कारणांचे प्रमाण नसले तरी असे मानले जाते की माता लक्ष्मीने आपल्या पतीला श्री.भगवान विष्णूंना परत मिळवण्यासाठी राजा बलीला रक्षासूत्र बांधून परत मिळवले होते. तेंव्हापासून हा सण रक्षाबंधन म्हणून साजरा केला जातो असे सांगितले जाते. धार्मिक कारणांमध्ये असे सांगितले जाते की भगवान श्रीकृष्ण यांच्या बोटाला जेंव्हा दुखापत झाली तेंव्हा द्रौपदी ने आपली भरजरी साडी फाडून श्रीकृष्णाची जखम बांधली. ही घटना श्रावण महीन्यातील पौर्णिमेला घडली होती.पुढे जेंव्हा द्रौपदीचे चीरहरण होत होते तेंव्हा श्रीकृष्णाने साडी वाढवून तिचे रक्षण केले व भावाचे कर्तव्य पूर्ण केले. तेव्हापासून हा सण साजरा करण्याची परंपरा सुरु झाली असही मानलं जातं.
रक्षाबंधन सण साजरा करण्यापाठीमागे ऐतिहासिक कारणही आहे. ईतिहासकार असं सांगतात की जेंव्हा बहादुरशहाने मेवाडवर आक्रमण केले तेंव्हा रानी कर्मावती ने मुघल बादशहा हुमायु ला रक्षासूत्र पाठवून देऊन बहीणीचे रक्षण करण्याची विनंती केली.तेंव्हा हुमायु ने राखीचा मान राखून आपले बलाढ्य सैनिक पाठवून दिले व रानी कर्मावती चे व तीच्या राज्याचे रक्षण केले व भावाचे कर्तव्य पार पाडले.पुढे भावाबहिणींच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून हा सण रक्षाबंधन म्हणून साजरा केला जाऊ लागला.जेव्हा जगज्जेता सिकंदर विश्वविजयाची ईच्छा घेऊन भारताजवळ आला तेंव्हा सर्वप्रथम राजा पुरुने त्याला प्रतिबंध केला.हे पाहून सिकंदराच्या पत्नीने घाबरून जाऊन आपल्या पतीच्या रक्षणासाठी राजा पुरुला राखी/ रक्षासूत्र पाठवून दिले व आपल्या पतीच्या सुरक्षिततेची कामना केली.राजा पुरुनेही बहीणीचे म्हणने मानले व राखीचा मान राखला.
साहित्य क्षेत्रात व फील्मक्षेत्रात तर राखी हा कायम चर्चेचा व कथेचा विषय ठरला आहे.राखीवरील व रक्षाबंधन या विषयावर अनेक कथा लिहल्या गेल्या,चित्रपट निघाले. आजही रक्षाबंधन व राखी यावरील नवीजुनी श्रवणीय गाणी आपल्या ओठावर तरळतात.भारत सरकारने ही रक्षाबंधन या सणासाठी योजना राबवली आहे. पाच रुपयाच्या पाकीटात पन्नास ग्रँम वजनापर्यंतची राखी निशुल्क पाठवू शकतो,यामुळे बहीण जास्तीत जास्त राख्या पाठवू शकेल.पावसाळ्यात पाकीट खराब होऊ नये म्हणून खास लिफाफाही तयार केला आहे. पोस्ट ऑफिस वर या दिवसात कामाचा जादा ताण पडतो पण तरीही हे काम ते आनंदाने करतात.आजच्या संगणक युगात दूददेशी राहणाऱ्या आफल्या भावाला बहीण आता ऑनलाइन राखी खरेदी करून पाठवते. रक्षाबंधन हा सण राष्ट्रीय एकात्मता वाढवतो व मानवतेला महत्त्व देणारा आहे. कारण यादिवशी आपल्या स्वतःच्या भावाबरोबर दुसऱ्या धर्मातील मुलांना भाऊ मानून त्यांनाही राखी बांधली जाते.
भावा बहीणींच्या प्रेमाचे प्रतिक असलेला हा सण आपापसातील प्रेम वाढवतो व मनातील कटुता दूर करतो.जग बदलत चाललयं पण भावाबहीणींचे प्रेम हे तसेच आहे. हे प्रेम व हा पवित्र सण कायमच राहील व राहीला पाहिजे.
आज आपण पाहतो समाजात स्त्री-भ्रूणहत्या, स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार, हुंड्यासाठी सुनांना जाळणे,मारणे,अपमान करणे,आत्महत्येस प्रवृत्त करणे,स्त्रियांवरील बलात्कार हे सर्व पाहिले की मन खूप दु:खी व ऊदास होते.मला येवढेच म्हणायचे आहे की प्रत्येक भावाने आपल्या बहीणीबरोबर ईतर सर्व मुलींनाही बहीण मानून तीचे रक्षण करण्याचा संस्कार जर आपण त्यांना देण्यात यशस्वी झालो तर आज जगात कोणतीही बहीण ही दु:खी राहणार नाही. व हा सण समाजात एक सामाजिक एकता निर्माण करेल.
रक्षाबंधनाच्या बंधनात
बांधले बहीनीने भावाला
अन्याय, अत्याचार होता
भाऊ धावला रक्षणाला.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.9881862530
राज्यस्तरीय चारोळी स्पर्धेसाठी
विषय-- तांडव महापुराचे
( 1 )
आल्या पाऊसधारा
बरसल्या अशा जोरात
ओसंडून वाहिल्या नद्या
बुडाली जनता महापुरात
(2 )
तांडव महापुराचे
थरकाप उडाला मनाचा
हाहाकार माजला चहुकडे
धीर सुटला मानवाचा
(3)
सरसावले हात मदतीला
जग सारे एकवटले
हवालदिल झाली जनता
पाणी डोळ्यात दाटले
(4 )
नियोजन पाण्याचे
हवे आम्ही करायला
झाडे लावू झाडे जगवू
रक्षूया पर्यावरणाला
. ( 6 )
मानवता , माणुसकी
दिसून आज आली
पूरग्रस्तांच्या मदतीला
सान-थोर धावून गेली
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर
षटकोळी
विषय - ईद मुबारक
आया त्यौहार सुहाना
कुर्बानी देंगे बकरियोंकी
नमाज पढेंगे ईदगाहपर
कहेंगे ईद मुबारक
गले लगायेंगे सबको
प्यार लुटायेंगे एकदुसरेपर
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
षटकोळी
विषय - श्रावण मास
श्रावण मास आनंदाचा
सण साजरा करण्याचा
हिरव्या गालीच्याचा सुंदर
रिमझिम पाऊस बरसणारा
ऊनपावसाचा खेळ दाखवणारा
देतो समाधान खरोखर
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
रक्षाबंधन एक पवित्र त्यौहार
भारतीय संस्कृती पूरी दुनियाभर में अलग है ।क्योंकी यहाँ अनेक धर्मोंके लोग मिलजुलकर रहते है , जो बाकी देशोंमें दिखाई नहीं देता। हर धर्म के लोग अपना अपना त्यौहार बडे धुमधामसे मनाते है । इसमें अनेकविध त्यौहारों की भरमार है । विविधता में एकता यह भारत की विशेषता है ।
रक्षाबंधन का त्यौहार का एक अलग ही महत्त्व है। ये भाई बहन के पवित्र रिश्ते से बंधा है। भाई-बहन का त्यौहार भी कहा जाता है। इसमें प्यार ,स्नेह, संवेदना भरी हुई है । ये हिंदू और जैन धर्म में बडे ऊल्हास के साथ मनाया जाता है। इसदिन बहन सुबह जल्दी उठकर स्नान करके नये कपडे पहनती है और राखी की थाली सजाकर भाई को तिलक लगाकर आरती उतारती है और अपने भाई के दाहिने कलाई पर राखी या रक्षासूत्र बाँधकर उसे मिठाई खिलाती है, और भाई को उसकी रक्षा करने को कहकर भाई के लंबे आयु के लिए और उसके स्वास्थ के लिए कामना करती है। भाई बहन के लिए उपहार लाता है और बहन को खुश करता है। भाईयों का भी फर्ज बनता है की वे अपनी बहना को कभी दुख न देंगे और न दुख को आने देंगे ।इसदिन भाई या बहन अगर दूर होते हैं फिर भी बहन या भाई एकदुसरे के यहाँ जाते ही हैं और रक्षाबंधन मनाते है।
रक्षाबंधन मनाने के पीछे अनेक कारण है। उसमें पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक कारण भी है। पौराणिक कारण का कोई प्रमाण नहीं है,लेकीन कहा जाता है की माता लक्ष्मी ने राजा बली को रक्षासूत्र बाँधकर उससे अपने पती, भगवान श्री.विष्णू को वापस माँग लिया था। तभी से रक्षाबंधन का त्यौहार का प्रचलन माना जाता है।
धार्मिक कारण में यह बताया जाता है महाभारत में भगवान श्रीकृष्ण के ऊँगली में जब चोट आती है तब द्रौपदी ने अपनी साडी फाडकर श्रीकृष्ण की ऊँगली को बाँधा था,ये घटना श्रिवण महीने के पूर्णिमा के दिन हो गयी थी। जब द्रौपदी का चीरहरण हो रहा था तब श्रीकृष्ण ने द्रौपदी की साडी बढाकर भाई का कर्तव्य पूरा कीया था। तबसे इसप्रकार रक्षाबंधन का त्यौहार मनाने की परम्परा शुरु हुई
रक्षाबंधन मनाने के पीछे ऐतिहासिक महत्त्व भी है। इतिहासकार कहते हैं की जब बहादुरशहा ने जब मेवाडपर हमला कर दिया था तब रानी कर्मावती ने अपनी और राज्य की रक्षा करने के लिए मुगल बादशहा हुमायु को रक्षासूत्र भेजकर एक भाई के नाते बहन की रक्षा करने बिनती की । हुमायु ने भी रक्षासूत्र का मान रखते हुए अपनी विशाल सेना भेजकर रानी कर्मावती और उसके राज्य की रक्षा की थी। आगे चलकर भाई-बहन के प्यार के प्रतिक को रक्षाबंधन के त्यौहार के रुप में मनाया जाने लगा। जब सिकंदर विश्वविजय की कामना लेकर निकला था,तब वह भारत की सीमापर उसे पहली बार राजा पुरु ने उसे रोका था। सिकंदर की पत्नी ने अपने पति की रक्षा के लिए राजा पुरु को रक्षासूत्र भेजा।राजा पुरु ने बहन का कहना माना और राखी की लाज रख ली।
साहित्य क्षेत्र में , फील्मों के क्षेत्र में रक्षाबंधन कहानी का विषय बन गया है।राखी के नये पुराने गीत आज भी श्रवणीय हो गये है। सरकारने भी रक्षाबंधन के अवसर पर डाक विभाग में पाँच रु. के लिफाफे में पचास ग्रँम वजन तक की राखी मुफ्त भेजने का प्रबंध कीया है , ताकी बहने अपने भाईयोंको जादा से जादा राखी भेज सकें।बरसात में कागज खराब न हो ईसके लिये भी खास लिफाफा तैयार कीया है।डाकघरोंपर ईसदिन जादा बोझ आता है फिर भी वे ईस काम कों खुशी से करते हैं।आज का युग संगणक युग है।ईस आधुनिक युग में दूर रहनेवाले भाई को बहन ऑनलाइन राखी खरीदकर भेजती है। रक्षाबंधन का त्यौहार राष्ट्रीय एकात्मता को बढाता है और मानवता को महत्व देता है।
भाई-बहन के प्रार का ये प्रतिक रक्षाबंधन का त्यौहार समाज में आपसी भाईचारा बढाने का काम करता है। मन कघ कटुता को दुर करने हेतू भी यह काम आता है।जमाना बदल गया लेकीन भाई-बहन का प्यार और रक्षाबंधन का त्यौहार नहीं बदला।सदियोंसे चला आ यहा ये त्यौहार कभी खत्म ही नहीं होगा, न होना चाहीए।
आज हम देखते है , स्त्री-भ्रूण हत्या , नारी के साथ अत्याचार, जबरदस्ती दहेज की लालच में आकर बहुओंको जलाना,मारना,उनका अपमान करना,उन्हें प्रताडीत करना यह सब हो रहा है। यह देखकर मन दुखी हो उठता है। मुझे कहना है की हर भाई को अपने बहन के साथ साथ बाकी सब लडकीयों को भी बहन मानने का संस्कार अगर हम उन्हें देने में कामयाब होते हैं तो दुनिया की कोई भी बहन कभी भी दुखी नहीं होंगी।रक्षाबंधन का ये त्यौहार आज की ईस दुनिया में महत्वपूर्ण स्थान रखता है।सामाजिक एकता बनाए रखने का काम करता है।
राखी के बंधन में ,
भाई को बाँधा बहन ने ।
वचन रक्षा का दिलसे ,
दिया बडे प्यार से भाईने ।
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिला.कोल्हापूर.
9881862530
स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - अतिवृष्टी
बरसले मेघ आज मुसळधार
वाटे जणू लागली संततधार
चराचरात दाटे भीती आपसूकच
जलमय झाला परीसर ,निराधार
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - साखरपुडा
विवाहबंधनाची नांदी होते
गोड अशा साखरपुड्याने
जीवनपट उलगडत जातो
सुख दुखा:च्या आठवणीने
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
उपक्रम
षटकोळी
रिमझिम पाऊस सुरु
आला श्रावण महिना
रिमझिम पाऊस सुरु
नभ भरुन आले
मळभ दाटून भरले
अलगद खाली उतरून
असे बरसून गेले
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
स्पर्धेसाठी
अष्टाक्षरी काव्य
विषय- माझी आज्जी
माझी आज्जी नेहमीच,
खूप आनंदी असते.
शांत संयमी राहते ,
कधी तक्रार नसते .
जरी नाही ती शिकली ,
शहाण्यांना शिकवते .
अनुभव तिचे थोर ,
जगा सांगत असते .
प्रत्येकाच्या जीवनात ,
हवी अशी आज्जीबाई .
सर्वांनाच करते ती ,
नेहमीच घाई घाई .
माझी आज्जी ऐकवते ,
रोज एक नवी गोष्ट .
सडेतोड बोल तिचे ,
अर्थ असतोच स्पष्ट .
लवकर नीजे , उठे ,
मग्न नेहमी कामात .
पाहू तेंव्हा असतेच ,
काम सतत हातात .
देते संस्काराचे बोल ,
समजून सर्व घेऊ ,
देवतूल्य माझी आज्जी ,
महानता तिला देऊ .
आज्जी शोभा हो घराची ,
स्थान द्या तिला मनात ,
नका पाठवू कधीही ,
तिला हो वृद्धाश्रमात .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
काव्यांजली
विषय - नागपंचमी
आला श्रावण
सणवार आले घरा
तोरण दारा
लागले
सण नागपंचमीचा
आता पुजू चला
भाऊ नागोबाला
भक्तीभावाने
मित्र हाच
आहे शेतकऱ्यांचा खरा
जपा जरा
याला
नागोबाला देव्हाऱ्यात
ठेऊन पूजन करती
आनंदाला भरती
येतसे
उपवास भावाचा
समस्त महिला करती
सुगरण करती
पुरणपोळी
समोर नागोबाच्या
दुध ,लाह्या , भाजणी
नैवेद्य असा
दाखवला
झोका उंच
झुलती छान माहेरवाशीण
समाधानी सवाष्ण
दिसते.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,. जिल्हा. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - सांत्वन
आले पार्थिव सैनिकाचे दारी
धाय मोकलून माय रडे
कसे करावे सांत्वन पत्नीचे
शब्दांनाही आज पडे कोडे.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर
दर्पणकाव्य
मल्लिकार्जुन
मल्लिकार्जुन
कैलास दक्षिणेतील
मल्लिकार्जुन
कृष्णाकाठावर वसलेले मंदिर आंध्रप्रदेशातील
मल्लिकार्जुन
दर्शनानेच होतात सर्व दु:खे दूर जीवनातील
मल्लिकार्जुन
माता मल्लिका,पिता अर्जुन वास्तव्याने बनलेले मंदिर पर्वतावरील
मल्लिकार्जुन
सभामंडपी विशाल नंदी सुंदर, साक्ष देतसे प्राचीन कोरीव काम मंदिरातील
मल्लिकार्जुन
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
स्पर्धेसाठी
चित्रकाव्य
माझा झोका
श्रावणातील या सुंदर समयी,
झूला मी झुलते आनंदाने .
मुक्त मी ,बेबंद मी आज ,
सोसलं आजवर खूप संयमाने.
वृक्षराज माझा सखा ,
भाऊराया आधार देतो मला.
अंगाखांद्यावर त्याच्या खेळून ,
रिझवते यला अन त्याला .
सूर्यप्रकाश साथीला येतो ,
सुवर्णप्रकाश सुंदर पसरतो.
वाटते मज भाग्य उजळले,
ऊंच माझा झोका जातो .
कूंतलभार हा असा झेपावला,
हवेशी गप्पा करु लागला .
गुज मनीचे सांगून गेला ,
अलवार झोके घेऊ लागला.
आसमंत ऊजळला सोनेरी,
प्रतिबिंब त्यात उठून दिसते.
मुक्तमनाने आनंदाने नार मी,
एकटीच मुक्तपणे झोके घेते .
प्रतिक मी नवयुगाची ,
प्रेरणादायी सर्वांना मी .
नको भिक अन् सहानुभूती,
आत्मनिर्भर दिसूदे जगाला मी.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
9881862530
स्पर्धेसाठी
अभंग काव्यस्पर्धा
विषय - सच्चा पोलीस शिपाई
कर्तव्यदक्ष सेनानी ।
देशप्रेमात रंगूनी ।।
देशभक्त हा म्हणूनी ।
ओळख समाजात ।। 1 ।।
दक्ष असे जीवनात ।
शांती ठेवी समाजात ।।
जरब ती आवाजात ।
आपसूकच येई ।। 2 ।।
ना अन्न ना पाणी याला ।
ना चुके तो कर्तव्याला ।।
भीत नाही मरणाला ।
बेधडक तत्पर ।। 3 ।।
ना सणवार पाहिला ।
नाही वेळ कुटुंबाला ।।
कीती यातना जीवाला ।
हसण्यावारी नेतो ।। 4 ।।
ध्येय एक देशसेवा ।
नको कुठलाच मेवा ।।
जातो सत्याच्याच गावा ।
वंदन करु चला ।।5 ।।
सच्चा पोलीस शिपाई ।
प्रार्थू याचीच भलाई ।।
वंदनीय ही सच्चाई ।
अभिमान आमचा ।। 6 ।।
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर
षटकोळी
विषय - स्वातंत्र्याचा जल्लोष
स्वातंत्र्याचा जल्लोष करतो
भारतीय नागरिक आनंदाने
राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते
राष्ट्रध्वजाला करुन वंदन
सलामी देती आबालवृद्ध
नसानसात देशभक्ती संचारते
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
दर्पणकाव्य
सोमनाथ
सोमनाथ
जागृत देवस्थान
सोमनाथ
गुजरात सौराष्ट्र येथील मंगलस्थान
सोमनाथ
प्रथम ज्योतीर्लिंग ,हिंदू वास्तूकलेचे पवित्र ठीकाण
सोमनाथ
चंद्रदेवाने केले निर्माण, दक्षिण एशियातील विश्वप्रसीद्ध, करतात पर्यटन
सोमनाथ
हिरण ,कपिला,सरस्वती यांचा ईथे होतो त्रिवेणी संगम होतो पावन
सोमनाथ
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.