Monday, 29 April 2019

कविता ( मुलगी असता घरी )

स्पर्धेसाठी

कविता

विषय - मुलगी असता घरी

घर कसं भरल्यासारखं वाटतं
जेव्हा मुलगी असते घरी.
घर जसं आनंदाने लागतं नाचू
कानकोपरा घराचा लागतो हासू
अन् उजळतो आशेच्या प्रकाशाने,सदोदित
मुलगी असते शान घराची
सर्वांच्याच लाडाची .

मुलगी असते कन्यारत्न ,
उजळवते दोन्ही घरांना
सासर अन् माहेरही...
संस्कारारातून आपल्या देते
शिकवण ताई बणून सर्वांची.
प्रसंगी बनते आई प्रेमाची..

जाते जेव्हा दुसऱ्या घरी
काळजाला पाडते पीळ .
मातापित्यांच्या डोळ्यांना
लागते धार अश्रुंची अविरत.
हासण्यावारी नेती सगळे
मुलगीचे मन जपण्यासाठी.

तुकडा काळजाचा असते
जिवापाड प्रेमाने जपलेले ,
ते एक संवेदनशील रोप असते..संसारातील.
मुलगीच बनते काठी शेवटी
म्हातारपणी आयुष्याच्या .
जपा , वाढवा ,शिकवा तिला
आमभान येउद्या तिला
मिळूदे बळ निर्भय जगण्याला.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment