Monday, 22 April 2019

अभंग रचना ( महाराष्ट्र देशा )

अभंग रचना

महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा ।
प्रणाम तुजला ।।
आशिष मजला ।
सदोदित ।

थोर परंपरा ।
संत महंतांची ।।
समाजसेवेची ।
इथे आहे ।

स्वातंत्र्य वीरांच्या ।
बलिदानानेच ।।
शूर तेजानेच ।
उजळली ।

लावणीचा बाज ।
थाप डफावर ।।
नाच तालावर ।
थिरकली ।

लोक कलांचाच ।
भरलाय मेळा ।।
साहित्यिक गोळा ।
आसपास ।

माय ही मराठी ।
बाणेदार बाणा ।।
आहे ताठ कणा ।
सदोदित ।

नऊवारी साडी ।
धोतराचा सोगा ।।
सुताचात धागा ।
आवडतो ।

अशी गाती गाणी ।
विसरून भान ।।
स्वराज्याची आण ।
सर्वांनाच ।

डोंगर दऱ्यांनी ।
सह्याद्री सजला ।।
गगनी भिडला ।
महानच ।

शिखर ते उंच ।
कळसूबाई चे ।।
आहे चढायाचे ।
प्रयत्नांती ।

केसांचा आंबाडा ।
शोभतोय शिरी ।।
कुंकवाची चिरी ।
शोभतसे ।

थोर राणी झाँसी ।
लढली शूराने ।।
ती प्राणपणाने ।
वीर झाली ।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment