Sunday, 7 April 2019

हायकू ( रानफुले )

स्पर्धेसाठी

हायकू

रानफुले

विविध रंगी
सुंदर रानफुले
रानी फुलले

नाजूक चण
मोहवती मनास
याचाच ध्यास

सान पाकळ्या
अलवार फुलती
छान झुलती

स्फूरते मनी
सौंदर्याची कविता
शब्द सरिता

कास पठारी
रानफुले डुलली
धरा हासली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment