Friday, 12 April 2019

हायकू ( शब्दगुंफण )

स्पर्धेसाठी

हायकू

विषय - शब्दगुंफण

मातेचे अश्रू
आहेत अनमोल
मनी सखोल

वृक्षाची फांदी
नका कधीही तोडू
भविष्य मोडू

मानवी मन
नाही कधी कळत
तरी वळतं

सुंदर सृष्टी
फुलवते मनाला
क्लांत जीवाला

नभ वाकले
भुईवर सांडले
मना भावले

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment