Tuesday, 9 April 2019

कविता मुक्तछंद ( मत )

मत

दुसऱ्याचे आपल्याबद्दल एकमेकांबद्दल ऐकतो ते मत
मतदानात महत्त्वाचे असते ते मत.ज्यावर ठरते अनेकांच्या जीवनातील गणितं
स्वतः बद्दल मांडतो तेही मतच... पण ठाम
एखाद्याबद्दलचे ठरते तेही मतच..पण गैरसमज, पूर्वग्रहदूषित असू शकते.
मतमतांतरे असतात सगळीकडेच...
कुणाला किती पटेल यावर ठरतात पुढील वाटाघाटी.
मतं घ्यावीत सगळ्यांचीच.
आपुलकी वाढते आपोआप
मतं असतात चांगली आणि वाईटसुद्धा...
न्याय प्रत्येक मताला देता येईलच असे काही नाही.
पण विचार प्रत्येक मताचा केलाच पाहिजे....
मतांसाठी लढल्या जातात
निवडणूका अन् स्पर्धाही.
प्रामाणिकपणे मिळणारी मते
लागावी लागतील मोजायला.
समजायला हवं महत्त्व प्रत्येकाला आपल्या मतांच..
विकतसुद्धा मिळतात आता
इथे सहजच कित्येक मते.
कींमतपण त्याची असते
तेवढीच हे कळणार कधी
व कुणाला ?
विवेकबुद्धी वापरून द्यायला हवीत मतं...
विचारांती वाटतं इथे कुणाचं काय जातं..?
आलेल्या वेळेचा करुन वापर
देशासंबधीच मतं मांडणाऱ्यांना देउया आपली
बहुमोल मतं....

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

No comments:

Post a Comment