Sunday, 7 April 2019

हायकू ( चाफा )

हायकू

चाफा

सोनेरी चाफा
मंदधुंद सुवास
अधीर श्वास

हिरवा चाफा
मोहवतो मनाला
क्लांत जीवाला

ऊंचच झाड
गर्द सुंदर पाने
त्यात सुमने

देतो सुगंध
प्रफुल्लित मनास
धुंद मनास

सुवर्ण कांती
लोचनाला सुखावे
हळू स्पर्शावे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment