स्पर्धेसाठी
विषय - दुष्काळ
ओसाड उजाड माळावर,
वणवण फिरते भरभर.
तापला सूर्यदेव माथ्यावर,
मिळेना पाणी वाटीभर.
चिमुरडी माझी अनवाणी,
पाण्याविना झाली दीनवाणी.
पाय भाजतात माझे आई,
नाही चपला माझ्या पायी.
काळजी नको जाईन मी भरभर,
आणीन पाणी नक्की कळशीभर.
घेऊन आता डोक्यावर हंडा,
तुडवू आपण माळ हा फोंडा.
यावा टँकर तरी माझ्या दारी,
मागणं हेच सरकार दरबारी.
नाही दुष्काळ नवीन मला,
उपाय शोधण्यात जन्म गेला.
वणवण पाण्यासाठी थांबवावी लागेल
गरज जलसमृद्धीची भागवावी लागेल.
मानसिकतेसाठी लोकसहभाग हवा,
मंत्र माणुसकीचा हा अनमोल ठेवा.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment