Monday, 8 April 2019

कविता ( प्रश्न शेतकऱ्यांचे )

कविता

प्रश्न शेतकऱ्यांचे

जो तो मग्न आहे
आपल्याच विश्वात
प्रश्नांना शेतकऱ्यांच्या
आहे जागा निवडणुकीत?

जाहीरनाम्यात सगळेच
शेतकऱ्यांना ठेवतात
निवडून आल्यावर त्यांना
अलगद बाहेर काढतात

प्रश्न शेतकऱ्यांचे येथे
सोडवणार का कोणी ?
आश्वासनांचा डोंगर
बाजूला करणार का कोणी ?

चारा ,हमीभाव , दर
कागदावरच शोभतात
पोशिंद्याचा वापर आता
फक्त निवडणुकीतच करतात

ज्याला त्याला आठवतोय
शेतकरी आणि त्याचे प्रश्न
निवडून आल्यावर वाटतेयं
हाच पोशिंदा फक्त विघ्न

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment