Tuesday, 23 April 2019

लघुकथा ( सलाम सैनिक हो.. )

स्पर्धेसाठी

शतशब्द कथा

सलाम सैनिक हो

माधवी सुट्टीवर आलेल्या सैनिक पती रमेशकडे अनिमिष नेत्रांनी पहात होती. काल रात्रीचा त्याच्या सहवासातील हळुवार प्रसंग आठवीत होती. तेवढ्यात मोबाईल वाजला. माधवीच्या काळजात चर्र..झाले. मोबाईल ऐकताना रमेशच्या  चेहऱ्यावरील भाव भरभर  बदलत गेले. तो ऊठला. तयारीला लागला.माधवीने ओळखले. दु:ख लपवून तीने त्याला नीरोप दिला.पण तिचे चित्त सगळे युद्धभूमीवर होते.

ती रोज बातम्यांकडे लक्ष देत असे. अखेर व्हायला नको होते ते झालेच. नियतीने डाव साधला. रमेश देशासाठी लढता लढता शहिद झाला.तिरंग्यात लपेटून रमेश गावी आला. माधवीचा हात आपसूकच आपल्या पोटावर गेला.सर्व गावाबरोबर माधवीच्या पोटातील बाळानेही बाबांंना सलामी दिली.माधवीचा निर्धार पक्का झाला. बाळाला सैनिकच बनवायचं. रमेशच्या स्वप्नांसाठी.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment